हायलाइट्स:

  • महाजन विरुद्ध खडसे यांच्यातील राजकीय लढाई आणखी टोकदार
  • खडसेंनी केला खळबळजनक दावा
  • करोना संसर्गाबाबत केलं भाष्य

जळगाव : जिल्ह्यातील मातब्बर नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून त्यांचा भाजपमधील नेत्यांसोबत संघर्ष होताना पाहायला मिळत आहे. भाजप नेते आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन विरुद्ध एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय लढाईने आता आणखी टोक गाठले आहे. कारण खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर आक्रमक शब्दांत निशाणा साधला आहे. (Eknath Khadse Vs गिरीश महाजन)

‘भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मोक्का कारवाईच्या भीतीनेच तर गिरीश महाजन यांना करोनाची लागण झाली नाही ना?’ असा टोला एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांना लगावला आहे.

Maharashtra New Restrictions:निर्बंधांची घोषणा होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राज्यातील जनतेला साद, म्हणाले…

राज्यातील अनेक नेत्यांना अलिकडील काळात करोनाचा संसर्ग झाला आहे. आमदार गिरीश महाजन यांनाही करोनाची लागण झाल्याची माहिती शनिवारी समोर आली. यावरून आता त्यांचे कट्टर राजकीय विरोधक एकनाथ खडसे यांनी शंका उपस्थित केली आहे. मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, या भीतीने तर महाजनांना करोना झाला नाही ना? असा सवाल खडसेंनी उपस्थित केला आहे.

‘त्या’ वक्तव्याचा वचपा काढला?

‘ईडीची चौकशी लागल्यामुळे एकनाथ खडसे यांना दुसर्‍यांदा करोना झाला, अशी प्रतिक्रिया काही महिन्यांपूर्वी गिरीश महाजन यांनी दिली होती. मात्र त्यावेळी मला खरंच करोना झाला होता. आताही गिरीश महाजन यांना दुसर्‍यांदा कोरोना झालेला आहे. मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झालेली दिसत आहे आणि त्या भीतीतूनच त्यांना करोना झाल्याचा संशय आहे. तरीही माझी प्रार्थना आहे की, गिरीश महाजन लवकर बरे व्हावेत, त्यांची समाजाला गरज आहे, महाराष्ट्राला गरज आहे. त्यांची प्रकृती उत्तम राहावी, अशी मी प्रार्थना करणार आहे,’ असं यावेळी एकनाथ खडसे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here