हिंगोली : सरत्या वर्षाच्या शेवटी काळी पावसाने महाराष्ट्राला मोठा फटका सहन करावा लागला होता. आता नवीन वर्षामध्येसुद्धा पुन्हा तिच पुनरावृत्ती होते की काय अशी धास्ती शेतकऱ्यांना लागली आहे. येत्या चार-पाच दिवसांत पावसासोबत गारपीटीची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुन्हा शेतकर्‍यांवर संकट ओढवण्याची शक्यता आहे.

२०२१ वर्षांमध्ये अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान करून कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक टंचाईच्या खाईत लोटले आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलादेखील तसंच काहीसं चित्र बघायला मिळतं. शेतकरी यातून सावरत नाही तोच पुन्हा त्याच संकटाचे संकेत नवीन वर्षाच्या रब्बी हंगामातही गोंगगावात असल्याचे चित्र बघायला मिळते.

Maharashtra Mini Lockdown : कोरोनाचा उद्रेक, मिनी लॉकडाऊनची घोषणा, राज्यात काय सुरु, काय बंद?
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, राज्याच्या इतर भागात पावसाने हजेरी लावली आहे. औंढा शहरा सोबत, हिंगोली, सेनगाव तालुक्याच्या काही भागात काही ठिकाणी मुसळधार तर काही भागात हलक्‍या स्वरूपाचा पाऊस बरसला आहे. तर जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण आहे. आज सकाळीही सूर्यदर्शन झाले नाही. पडत असलेला अवकाळी पाऊस हा शेतकऱ्यांची धडकी भरवणारा आहे. रब्बी हंगामाची नुकसान होते की काय अशी चिंता शेतकऱ्यांना आता सतावू लागली आहे.

नियम मोडला की कारवाई अटळ, ५०% पेक्षा जास्त गर्दी, औरंगाबादच्या प्रसिद्ध हॉटेलला टाळं, त्यामुळे….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here