नागपूर : करोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत असल्याने घरोघरी चिंता व्यक्त होत आहे. मात्र, वाढ असली तरी दवाखान्यावर अद्याप ताण पडलेला नाही. शनिवारी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील सक्रिय बाधितांपैकी २१४ रुग्ण इस्पितळात दाखल असून १,५५१ डॉक्टरांच्या सल्ल्याने गृहविलगीकरणांतर्गत उपचार घेत आहेत.

करोनाबाधितांची संख्या दररोज शेकडोंनी वाढत असल्याने प्रशासन, नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ६९१ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ४ लाख ९६ हजार ७५६पर्यंत पोहोचली. शहरात शनिवारी ५४९ बाधित आढळले. ग्रामीणमध्येही बाधितांच्या संख्येचा आलेख सातत्याने वाढत आहे. चोवीस तासांमध्ये ग्रामीणमध्ये ११८ रुग्ण वाढले आहेत. तर २४ बाधित जिल्ह्याबाहेरचे आहेत. ग्रामीणमध्ये वाढत्या संख्येने जिल्हा प्रशासनातही चिंता वाढली आहे.

Weather Alert : ‘या’ जिल्ह्यात सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात, बळीराजाची चिंता वाढली

करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह येऊनही लक्षणे नसणे वा सौम्य असणे यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे. आजघडीला सर्वाधिक ४७ रुग्ण एम्सला असून त्यापाठोपाठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (मेडिकल) सात आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (मेयो) तीन रुग्ण आहेत. त्याशिवाय, बहुतांश खासगी रुग्णालयात एकही रुग्ण नाही. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांमध्ये शहरातील १,३५६ आणि ग्रामीण भागातील १९५ जणांचा समावेश आहे. शनिवारी एकूण १३२ रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. मुख्य म्हणजे, सध्याचा आकडा फुगलेला दिसून येत असला तरी ही लाट फारशी धोकादायक नसल्याचेही सांगण्यात येत आहे.

घरीच उपचारावर भर

सध्या घरोघरी सर्दी, खोकला, ताप असलेले रुग्ण आढळत आहेत. यातील बहुतेक करोना चाचणी न करता घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करून बरे होत आहेत. चाचणी आणि दवाखान्यात भरती होण्याचे प्रमाण कमी आहे.
‘निवडणूक पुढे ढकलण्याच्या मागणीत अर्थ नाही कारण…, नाना पटोलेंचा भाजपवर गंभीर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here