२४ वर्षीय महिला वकिलाने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, ५ डिसेंबर २०२१ रोजी त्यांना, कॉलगर्ल अशा नावाच्या अश्लिल ग्रुपवर त्यांचा क्रमांक जोडल्याची माहिती काही तरुणांनी दिली. याविषयीचा स्क्रीनशॉटही त्यांना पाठविला. त्यानंतर सायंकाळी एका मुलीने संपर्क साधत, महिला वकिलांना, त्यांचा मोबाईल क्रमांक सदर ग्रुपला चुकून जोडल्याची तिने माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महिला वकिलाने सायबर पोलीस ठाण्यात संबंधित मोबाईल धारकाविरोधात तक्रार दिली.
यानंतर याप्रकरणी आरोपीविरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सदर नंबरची डीटेल्स काढत मिनाज शेख याला उस्मानाबाद जिल्ह्यातून अटक केली. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता, १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. जे. पाटील यांनी दिले. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल जप्त केला आहे. तर सीमकार्ड तोडल्याची त्याने कबुली दिली.