मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढला असला तरी कोविड सेंटर्स रिकामे आहेत. बीकेसीमध्ये २४०० बेडपैकी ८०० बेडवर रुग्ण आहेत. दहीसरमध्ये ७५० बेड आहेत, पण अजून एकही रुग्ण तिथे दाखल नाही.

नवाब मलिक किरीट सोमय्या

मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढला असला तरी कोविड सेंटर्स रिकामे आहेत. बीकेसीमध्ये २४०० बेडपैकी ८०० बेडवर रुग्ण आहेत. दहीसरमध्ये ७५० बेड आहेत, पण अजून एकही रुग्ण तिथे दाखल नाही.

हायलाइट्स:

  • नेस्को सेंटरमध्ये २ हजार बेड्सपैकी ९०० बेड भरले आहेत
  • याचा अर्थ ९८ टक्के रुग्ण आपल्या घरी किंवा नर्सिंग होममध्ये बरे होतात

मुंबई : महानगरपलिकेतर्फे उभारण्यात आलेल्या मुंबईतील कोव्हिड सेंटर्सच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांना राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते नवाब मलिक (नवाब मलिक) यांनी सणसणीत टोला लगावला आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiaya) कधीच म्हैस दूध देते याकडे बघतच नाहीत, त्यांचे लक्ष नेहमी शेणाकडेच जाते, असे नवाब मलिक यांनी म्हटले. कोव्हिड सेंटरमुळे अनेकांचे जीव वाचत आहेत. एकही रुग्णाचा उपचाराशिवाय किंवा ऑक्सिजनशिवाय मृत्यू होत नाही. याउलट गुजरातमध्ये करोनाबाधितांचे खरे आकडे लपवून ठेवले जात आहे. पण किरीट सोमय्या महाराष्ट्रातील परिस्थितीवर टीका करत आहेत. किरीट सोमय्या यांनी शनिवारी गोरेगावमधील नेस्को कोव्हिड सेंटरची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी आर्थिक कमाईसाठी लोकांना घाबरवून कोव्हिड सेंटरमध्ये आणून भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप केला होता.

मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढला असला तरी कोविड सेंटर्स रिकामे आहेत. बीकेसीमध्ये २४०० बेडपैकी ८०० बेडवर रुग्ण आहेत. दहीसरमध्ये ७५० बेड आहेत, पण अजून एकही रुग्ण तिथे दाखल नाही. नेस्को सेंटरमध्ये २ हजार बेड्सपैकी ९०० बेड भरले आहेत. याचा अर्थ ९८ टक्के रुग्ण आपल्या घरी किंवा नर्सिंग होममध्ये बरे होतात. तसेच ज्यांचे लसीकरण झाले आहे त्यातील ९९.९९ टक्के लोक सुरक्षित असल्याचा दावाही सोमय्यांनी केला होता.
महापौर किशोरी पेडणेकरांची बीकेसी जम्बो कोविड सेंटरला भेट, पीपीई किट घालून रुग्णांशी संवाद
बार का उघडले हे मोदींना जाऊन विचारा, मलिकांचा सदाभाऊ खोत यांना सल्ला

विरोधकांना लोकांचा जीव महत्त्वाचा नसल्याची टीका नवाब मलिक यांनी केली. सदाभाऊ खोत राज्य सरकारने शाळा बंद करुन बार सुरु ठेवले, असे म्हणतात. मात्र, केंद्र सरकारनेच लहान मुलांना करोनाचा अधिक धोका असल्याने शाळा बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांना याबाबत विचारणा करावी. तसेच देशात पहिल्या लॉकडाऊनंतर केंद्र सरकारनेच सर्वप्रथम दारुची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे खोत यांनी शाळा बंद ठेवून बार सुरु का ठेवले जातात, याचा जाबही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारावा, असे नवाब मलिक यांनी म्हटले.

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: एनसीपी नेते नवाब मलिक यांनी भाजपच्या किरीट सोमय्या यांच्यावर टीकास्त्र सोडले
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here