मुंबई: छोट्या पडद्यावरील ‘देवमाणूस‘ या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. गेल्या वर्षी या मालिकेच्या पहिल्या पर्वानं प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाडच्या अभिनयाचंदेखील प्रचंड कौतुक झालं. या मालिकेच्या शेवटच्या भागानंतर प्रेक्षक फार आतुरतेनं दुसऱ्या भागाची वाट पाहात होते.
त्या दोघांच्या पुरावे गोळा करण्याच्या या झटापटीमध्ये देवीसिंग डिम्पलचा काटा काढायचं ठरवतो. मालिकेत पुढील आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल की देवीसिंग डिम्पलवर जीवघेणा हल्ला करणार आहे. तेव्हा डिम्पल या सगळ्यातून सुखरूप वाचेल की तिचा प्रवास संपेल? हे प्रेक्षकांना लवकरच कळेल.