औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाचं कोट्यवधी रुपयांचा नुकसान होत असून कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहावे असे आवाहन वारंवार महामंडळाकडून आणि सरकारकडून केले जात आहे. मात्र, अनेकदा संधी देवूनही कर्मचारी रुजू होण्यास तयार नसल्याने महामंडळाने कारवाईची बडगा कायम ठेवत आता अधिक तीव्र केला आहे. औरंगाबादमध्ये शनिवारी एकाच दिवसात १३ संपकऱ्यांना बडतर्फ करण्यात आले.

संपात पडलेल्या फुटीमुळे अनेक संघटनांनी माघार घेतली तर अनेक कर्मचारी कामावर हजर झाले. औरंगाबाद विभागातील सुमारे ९०० संपकरी पुन्हा एकदा कामावर हजर झाले आहे. पण दीड हजारपेक्षा अधिक कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहेत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासाठी महामंडळाकडून अनेकदा संधी देण्यात आली. पण कर्मचारी आपल्या विलीनीकरणाच्या मागणीवर कायम आहेत. त्यामुळे आता प्रशासनाने कारवाईची बडगा उगरात आतापर्यंत ५३ जणांना बडतर्फ केले असून शनिवारी एका दिवसात १३ जणांना बडतर्फ करण्यात आले आहे.

सर्दी-खोकल्याची साधी लक्षणं असणाऱ्यांसाठी मोठी बातमी, केंद्राकडून राज्य आरोग्य खात्याला निर्देश
एसटी पूर्वपदावर?

संपाचा वाढता कालावधी आणि कोर्टाकडून मिळत असलेल्या तारीख पे तारीख अशा सर्व परिस्थितीत आता एसटी कर्मचाऱ्यांचा संयम सुटत चालला आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी कामावर हजर होत असताना पाहायला मिळतायत. औरंगाबाद विभागात आत्तापर्यंत हजर झालेल्या ९०० कर्मचाऱ्यांमध्ये चालक-वाहक यांचाही मोठा समावेश आहे. त्यामुळे लाल परी पुन्हा एकदा पूर्वपदावर येताना पाहायला मिळत आहे. शनिवारी औरंगाबाद विभागातून १११ लालपरी धावल्या. या बसेसनी ३९३ फेऱ्या केल्या. यामुळे ६ हजार ६६७ जणांनी प्रवास केला.

Weather Alert : ‘या’ जिल्ह्यात सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात, बळीराजाची चिंता वाढली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here