हायलाइट्स:

  • पुणे पोलिसांचं पथक जळगावात दाखल
  • विद्या प्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी चौकशी
  • महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

जळगाव : भाजपचे आमदार गिरीश महाजन संशयित असलेल्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांचं पथक जळगावात दाखल झालं आहे. जळगावातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस जळगावात दाखल झाल्याने महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (गिरीश महाजन ताज्या बातम्या)

गिरीश महाजन यांच्यावर मोक्काची कारवाई होणार असून त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात चौकशीसाठी रविवारी पहाटेपासून पोलिसांचे ५० जणांचे पथक जळगावात दाखल झालं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

जळगावातील बहुचर्चित मराठा विद्या प्रसारक संस्थेची जागा हडप करण्यासाठी भोईट गटाला मदत करून आमदार गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी केली होती. या प्रकरणी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा नंतर पुण्यातील कोथरूड पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आला.

Coronavirus Restrictions: राज्यातील करोना निर्बंध आणखी कठोर होणार का, राजेश टोपे म्हणाले…

फिर्यादीत अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी म्हटलं होतं की, ते जळगाव येथील मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्था जळगावचे संचालक आहेत. त्यांना आरोपींनी पुण्यात संस्थेचे कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. ते पुण्यात आल्यानंतर त्यांना शिवीगाळ करत दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसंच त्यांना गाडीत जबरदस्तीने बसवत सदाशिव पेठेत असलेल्या एका फ्लॅटवर नेले. त्या ठिकाणी मारहाण करत गळ्याला आणि पोटाला चाकू लावला. फिर्यादी यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीलाही त्यांनी याठिकाणी डांबले. तर सर्व संचालकांचे राजीनामे आणले नाहीत तर एमपीडीएच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी घेतली होती.

दरम्यान, हा प्रकार जानेवारी २०१८ ते जानेवारी २०२१ या कालावधीत घडला होता. परंतु, त्यांनी तक्रार उशिरा केली आहे. याप्रकरणी गिरीश महाजन, रामेश्‍वर नाईक, निलेश भोईटे यांच्यासह एकूण २९ जणांवर निंभोरा येथे गुन्हा दाखल करण्यात येऊन तो कोथरूडला वर्ग करण्यात आला होता.

जळगावात ‘या’ पाच संशयितांच्या घरी चौकशी सुरू

कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात चौकशीसाठी पुणे पोलिसांचे पथक रविवारी सकाळीच जळगावात धडकले. पोलीस उपआयुक्त सुष्मा चव्हाण यांच्या नेतृत्वात पाच पथके तयार करण्यात येऊन या पथकाकडून स्वंतत्ररित्या चौकशी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here