हायलाइट्स:

  • साई मंदिराबाबत सोशल मीडियावर अफवा
  • मंदिर प्रशासनाने केला खुलासा
  • अफवांवर विश्वास न ठेवण्याचं केलं आवाहन

अहमदनगर : राज्यात मागील काही दिवसांत करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाल्याने राज्य सरकारने पुन्हा निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मंदिरांबाबत अद्याप नवी नियमावली जाहीर करण्यात आलेली नाही. असं असताना शिर्डीच्या साई मंदिराबाबत सोशल मीडियात अफवा पसरल्याने मंदिर प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला आहे. (मग बाबा मंदिर मार्गदर्शन)

शिर्डीतील साई मंदिर सध्या आहे त्याच पद्धतीने सुरू राहणार असून नवे नियम लागू केल्याच्या सोशल मीडियातील अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन साईबाबा संस्थान मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

गिरीश महाजनांच्या अडचणी वाढणार? पुणे पोलिसांचे पथक जळगावात दाखल

साईबाबांचे मंदिर शनिवार व रविवार रोजी बंद राहणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र मंदिराबाबतचे अद्यापपर्यंत कुठलेही आदेश शासन स्तरावरून निर्गमित झालेले नाहीत. त्यामुळे अशा अफवांवर भाविकांनी विश्वास ठेवू नये, असं मंदिर प्रशासनाने म्हटलं आहे.

Coronavirus Restrictions: राज्यातील करोना निर्बंध आणखी कठोर होणार का, राजेश टोपे म्हणाले…

शासनाकडून यासंदर्भातील आदेश प्राप्त झाल्यास याबाबत साईबाबा संस्थान मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या माहितीस्तव तशी माहिती जारी केली जाईल, असं साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंदिराबाबत पुन्हा निर्बंध लागू होण्याची शक्यता निर्माण झाल्याने मंदिर परिसरातील व्यावसियांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here