हायलाइट्स:

  • अल्पवयीन बालिकेने दिला मुलीला जन्म
  • पीडितेसोबत गांधीनगर येथे गैरकृत्य
  • पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

नाशिक : गांधीनगर वसाहतीतील क्वार्टरचा गैरकृत्य करण्यासाठी वापर होत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. १७ वर्षीय बालिकेला वारंवार येथील इमारतीत नेऊन बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले. त्यामुळे ती बालिका गर्भवती राहिली आणि तिने एका मुलीस जन्म दिल्याची घटना घडली आहे. बॉबी उर्फ पियुष चौहान असं अत्याचार करणाऱ्या आरोपीचं नाव असून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. (नाशिक बलात्कार प्रकरण)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित बॉबी हा पीडित बालिकेच्या ओळखीचा होता. याच ओळखीतून तो पीडितेला पडीक इमारतीत घेऊन जायचा. तेथील एकांताचा फायदा उठवत संशयित बॉबीने पीडितेसोबत बळजबरीने शारीरिक संबंध स्थापन केले. फेब्रुवारी ते ऑगस्ट या दरम्यान वारंवार घडलेल्या या घटनेतून पीडिता गर्भवती राहिली व या प्रकरणाची वाच्यता झाली. मात्र तोपर्यंत उशीर झाल्याने अखेर पीडितेने मुलीस जन्म दिला.

आणखी एका शिवसेना आमदाराचे पक्षावरच टीकेचे बाण; भाजपबद्दल म्हणाले…

याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर बॉबी उर्फ पियूष चौहान याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६, ३७६ (२)बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम अर्थात ‘पोस्को’ अधिनियम २०१२ चे कलम ४, ६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, गांधीनगर येथील सरकारी वसाहत एकेकाळी गजबजलेली असायची. मात्र आता कामगारांचे वास्तव्य नसल्याने आणि कामगार आता बाहेर स्वतःचे घर घेऊन राहत असल्याने हा परिसर ओस पडला आहे. त्यामुळे या परिसरात गैरकृत्य वाढली आहेत. मद्यपींचा अड्डा म्हणून देखील हा भाग ओळखला जाऊ लागला आहे. येथे सर्रास अवैध धंदे चालतात. त्यात मटका, दारू विक्री, पत्त्यांचा क्लब असे अनेक प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे या परिसरात सुरक्षा व्यवस्था निर्माण करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here