याबाबत बोलताना नागपूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी सांगितले की, ‘नागपूर शहरात मागील महिन्यापासून ‘बीएच’ नोंदणीला सुरुवात झाली आहे. परराज्यामध्ये ज्यांच्या सातत्याने बदल्या होत असतात, त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे. मात्र या सुविधेचा लाभ घेण्यासाठी संबंधीत कंपनीची दोन राज्यांमध्ये किमान चार कार्यालये असणे आवश्यक आहे.”
‘बीएच सिरीज’साठी हे करा
बीएच सिरीजसाठी परिवहन मंत्रालयाच्या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना विचारण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. बीएच सिरीज हवी असल्यास दोन वर्षांचा रस्ते कर भरलेला असणे गरजेचे आहे.
असा असेल नंबर
बीएच सिरीजच्या वाहनाच्या नंबर प्लेट्सवर सुरुवातीला दोन संख्यांमध्ये वाहन नोंदणीचे वर्ष, त्यांनतर बीएच, हा भारत सिरीज कोड आहे. त्यानंतर चार अंकी क्रमांक आणि शेवटी राज्याचे शब्द राहतील. बीएचनुसार नोंदणी केल्यास त्या त्या राज्यात संबंधितांना कर भरावा लागणार आहे.