औरंगाबाद : आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून तयारी सुरू आहे. मात्र महाविकास आघाडी या निवडणुका सुद्धा एकत्र लढणार का?, याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. पण आता काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करत, या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे या निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची यादी सुद्धा प्रदेश कार्यालयाकडून मागवण्यात आली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचे स्पष्ट केलं होतं. पण आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने काढलेल्या एका पत्रामुळे निवडणूक स्वबळावरच लढण्याच काँग्रेसन ठरवले असल्याचं पून्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

ST संपावर प्रशासनाने शोधला पर्याय, कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; ६ खासगी चालकांची नियुक्ती

काँग्रेस बातम्या

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी राज्यातील सर्व शहर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटी ८ जानेवारी एक पत्र पाठवले आहेत. ज्यात महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचा उल्लेख केला आहे. म्हणून आपल्या जिल्ह्यातील इच्छुकांच्या नावांची यादी प्रदेश कार्यालयाला पाठवण्याची सूचना या पत्रात करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढवणार हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं असून, राष्ट्रवादी आणि शिवसेना काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राज्य बदलले तरी वाहन क्रमांक राहणार कायम, ‘बीएच सिरीज’ साठी काय करायचं? वाचा सविस्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here