हायलाइट्स:

  • आता, हे काय भलतंच!
  • करोना विषाणूचा नवा व्हेरियंट दाखल
  • सायप्रसमध्ये आढळला डेल्टा आणि ओमिक्रॉन मिश्रित व्हेरियंट

निकोसिया, सायप्रस :

जगभरात करोनाच्या ‘डेल्टा‘ व्हेरियंटनं घातलेला धुमाकूळ शांत होत नाही तोवरच ‘ओमिक्रॉन‘ व्हेरियंटनं अवघ्या जगाला धडकी भरवली. या दोन्ही व्हेरियंटच्या धोक्यावर शास्त्रज्ञांना योग्य पकड मिळतेय असं दिसत असतानाच सायप्रसमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायप्रसमध्ये तज्ज्ञांना करोना विषाणूचा आणखीनं एक व्हेरियंट आढळून आला आहे.

धक्कादायक म्हणजे, करोना विषाणूच्या ‘डेल्टा’ आणि ‘ओमिक्रॉन’ हे दोन व्हेरियंट एकत्र येऊन हा नवा व्हेरियंट तयार झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येतंय.

डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या या मिळत्या – जुळत्या नव्या व्हेरियंटला तज्ज्ञांनी ‘डेल्टाक्रॉन‘ असं नाव दिलंय.

‘बायोटेक्नॉलॉजी आणि मॉलिक्युलर व्हायरोलॉजी’च्या प्रयोगशाळेचे प्रमुख आणि ‘सायप्रस युनिव्हर्सिटी’चे प्राध्यापक लिओनडिओस कोस्ट्रिकिस यांच्या म्हणण्यानुसार, देशात आत्तापर्यंत ‘डेल्टाक्रॉन’चे २५ रुग्ण आढळून आले आहेत.

Omicron Variant: करोनाची अंताकडे वाटचाल! ‘ओमिक्रॉन’च्या महालाटेत खुशखबर
Coronavirus in China: करोनाची धडकी; केवळ तीन रुग्ण आढळले आणि संपूर्ण शहर लॉकडाऊन!

करोना संसर्गाची लागण झाल्याचं आढळून आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या बहुतेक रुग्णांमध्ये दुहेरी संसर्ग आढळून आल्याचं तज्ज्ञांच्या गटाचं म्हणणं आहे.

डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या रुग्णांची सध्या नोंद केली जात आहे. यातच आता एका नव्या प्रकाराची भर पडलीय जी या दोन्ही व्हेरियंटचं मिश्रण आहे, असं कोस्ट्रिकिस यांनी एका स्थानिक टीव्ही चॅनेलशी बोलताना म्हटलंय.

‘डेल्टाक्रॉन’ अधिक संसर्गजन्य आहे किंवा नाही किंवा जुन्या व्हेरियंटहून हा नवा प्रकार किती धोकादायक आहे याबद्दल अद्याप स्पष्टता नाही.

नव्या व्हेरियंटची लक्षणंही याआधीच्या दोन वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये दिसलेल्या लक्षणांसारखीच आहेत.

उल्लेखनीय म्हणजे, जागतिक आरोग्य संघटना किंवा इतर कोणत्याही आंतरराष्ट्रीय संस्थेकडून सध्या या नव्या व्हेरियंटला अधिकृतपणे मान्यता देण्यात आलेली नाही.

Artificial Sun: चीनच्या ‘कृत्रिम सूर्याचा’ ऊर्जा निर्मितीचा नवा रेकॉर्ड; जगाच्या चिंतेत भर!
‘अॅस्ट्रॉईड नाही या तर एलियन्सनं पृथ्वीवर धाडलेल्या मिसाईल्स’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here