औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड शहरातील छत्रपती शिवाजीनगर या गजबजलेल्या वस्तीतील एका अपार्टमेंटमध्ये भरदिवसा एका भामट्याने घरात घुसून महिलेच्या गळ्याला चाकू लावून अंगावरील हजारो रुपयांचे दागिणे लंपास केले, ही धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली असून या प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बँक ऑफ इंडियाच्या सिल्लोड शाखेत कार्यरत असलेल्या व्यवस्थापक नितीन काकडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी एक अज्ञात इसम बिल्डिंगमध्ये येऊन त्यांच्या घरासमोरील रूम बघण्यासाठी येऊन गेला होता. दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती पुन्हा आला आणि काकडे यांच्या घरासमोर येऊन त्यांच्या पत्नीला म्हणाला की, मी या बिल्डिंगमध्ये घर भाड्याने घेतले आहे. पाण्याची बकेट व पिण्यासाठी पाणी द्या, असे म्हटल्यावर पत्नी त्याला पाणी देण्यासाठी घरात गेल्यानंतर सदरील इसमाने तिच्या पाठीमागे घरात जाऊन पत्नीचे तोंड दाबून चाकूचा धाक दाखविला.

Breaking : आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसचा मोठा निर्णय, इच्छुकांच्या याद्याही मागवल्या
यामुळे घरात एकट्या असलेल्या काकडे यांची पत्नी घाबरून गेली. तर यावेळी या भामट्याने झोपलेले बाळही मारून टाकण्याची धमकी देत पत्नीकडून अंगावरील सोने, चांदीचे दागिने व कपाटातील दागिन्यांसह एकूण साडेअकरा ग्रॅम सोने व लहान मुलाचे पाच भाराचा चांदीचा गोफ घेऊन पसार झाला. यानंतर घाबरलेल्या पत्नीला काकडे यांनी गावी नेऊन सोडले. त्यानंतर पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला. पण भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

ST संपावर प्रशासनाने शोधला पर्याय, कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; ६ खासगी चालकांची नियुक्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here