मुंबई-करीना कपूर ही बॉलीवूडमधली एक अशी अभिनेत्री आहे, जी तिच्या सिनेमांनी चाहत्यांच्या मनावर तर राज्य करतेच, शिवाय तिचा फॅशन सेन्सदेखील अप्रतिम आहे. करिना जे काही घालते ती एक नवीन फॅशन होऊन जाते. एवढेच नाही तर चाहते तिची स्टाईल कॉपी करण्याचाही प्रयत्न करतात. पण कधी-कधी करिना तिच्या कपड्यांमुळे ट्रोल होते आणि यावेळीही असंच काहीसं झालं.

थोरल्या भावाच्या निधनानं महेश बाबू भावुक

काही दिवसांपूर्वी करिना तिचा मित्र आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी गेली होती. यावेळी करिनाने जे काही घातलं होतं त्याची अनेक दिवस चर्चा झाली होती. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. ते फोटो पाहून अनेक युझर्स प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखू शकले नव्हते.

करीना कपूर

करिना कपूरने ओव्हरसाईज टी-शर्टसह काळे शॉर्ट्स आणि काळे शूज घातले होते. अभिनेत्रीचा हा टीशर्ट Balenciaga कंपनीचा आहे, ज्याची किंमत ३३ हजार रुपये आहे. अभिनेत्रीने केसांचा बन बनवून तिचा लुक पूर्ण केला होता. यासोबत तिने सोनेरी रंगाची बॅग घेतली होती. करिनाचा हा लुक चाहत्यांना तर आवडला होता, पण असे अनेकजण होते ज्यांना तिचा हा लुक फारसा आवडला नाही.


काही लोकांना करिना कपूरचा हा लुक अजिबात आवडला नाही, त्यामुळे लोक तिला ट्रोल करताना दिसत आहेत. एका यूजरने करिनासाठी लिहिले की, ‘पँट घालायला विसरली.’ त्याचवेळी दुसऱ्या यूजरने कमेंट करत विचारले की, ‘कदाचित कपडे शिवण्यासाठी मनीष मल्होत्राच्या घरी गेली असेल.’ अनेक यूजर्सनी करिनावर कमी अधिक प्रमाणात अशाच प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सलमान खानसोबत काम करण्यास आयुष शर्माचा नकार

दरम्यान, करिनाला काही दिवसांपूर्वी करोना व्हायरसची लागण झाली होती, त्यानंतर ती घरात क्वारन्टाइन होती. या दिवसांमध्ये करिना तिची मुलं तैमूर, जेह आणि पती सैफ अली खानपासून दूर होती. त्या काळात अनेकदा करिना कुटुंबाला मिस करत असणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करायची.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here