गडचिरोली सारख्या मागास जिल्ह्यात प्रगत शेती करायची झाल्यास आवश्यक सोयी सुविधा मिळणे कठीण आहे. मात्र, संजय गंडाटे हा तरूण प्रतिकूल परिस्थीतीवर मात करीत नैसर्गिक पद्धतीन मोत्याची शेती करतोय. या प्रवासाबद्दल संजय सांगतो ‘एलएलबी झाल्यावर मला नोकरी करायची नव्हती, काहीतरी वेगळे करायचे हे मनात ठरवलं होतं. पण,आर्थिक परीस्थीती बेताची असल्याने व्यवसाय देखील कसा करावा हा प्रश्न माझ्यासमोर होता. लहानपणापासून मोत्यांबद्दल मला आकर्षण असल्याने मोतीचे उत्पन्न घ्यायचे ठरवले. परंतु या बद्दल प्रशिक्षण जवळपास कुठेही उपलब्ध नव्हते, एकेदिवशी गडचिरोलीतील कृषी महाविद्यालयात गेलो तिथे याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती सुद्धा अपुरी होती. ‘मला तिथे एक प्राध्यपक भेटले त्यांच्या मदतीने इंटरनेटवरून यासदंर्भात संपूर्ण माहिती गोळा केली व प्रयोगाला सुरवात केली. पहिल्यांदा मला अपयश आले. दुसर्यांदा देखील अपयशाचा सामना करावा लागला. मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचेही तो सांगतो.
वाचाः
मोत्याचे प्रयोग करताना पैशांची जुळवाजुळव कशी केली याबद्दल तो म्हणतो ‘मला मोत्याची शेती करायचीच होती. बऱ्याच वर्षांपासून बचत केलेला पैसा या व्यवसायात गुंतवला. सुरवातीला कमी गुंतवणूक करायचा. प्रयोग यशस्वी झाल्यास मग मोठी गुंतवणूक करायची असे मी आधीच ठरवले होते. मोत्याच्या उत्पादनात गुंतवणूकीच्या ९ पट अधिक नफा असतो. पण त्यात जोखीमही तेव्हढीच असते, ती घ्यायची मी ठरवलं आणि पुढचा प्रवास सुरू केला.
दरम्यान संजयला एका वाईट प्रसंगाला समोरे जावं लागलं याविषयी तो म्हणाला ‘मला स्वप्नात देखील वाटल नव्हतं की माझे मोती कुणीतरी चोरून नेतील, पण हे घडलं, या मोत्यांची किमंत ७ ते ८ लाख इतकी होती. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला पण मी खचलो नाही. माझा प्रयोग यशस्वी झाला याचे समाधान देखील होते. म्हणून मी पुन्हा जोमाने कामाला लागलो. घरीच कृत्रिम टॅंक तयार केले आणि तिथे मोत्याचे उत्पादन घेणे सुरू केल्याचे तो अभिमानाने सांगतो. माझ्या मोत्यांच्या शेतीबद्दल माध्यमांमध्ये बरचं लिहलं गेलं, त्यामुळे इच्छुकांनी प्रशिक्षण देण्याची विनंती केली. आज मी अनेकांना मोत्यांच्या शेतीसंदर्भात प्रशिक्षण देतो असे तो पुढे म्हणाला.
वाचाः
देविदेवतांच्या आकाराच्या मोतीला मोठी मागणी
केवळ साधे मोतीचे उत्पादन घेतान विविध आकाराचे मोती तयार करता येतील का याची मी चाचपणी केली, तसे प्रयत्न चालू केले. यातून देविदेवतांच्या आकाराचे मोती तयार झाले. या मोतींना बाजारात मोठी मागणी आहे. साध्या मोतीच्या तुलनेत याला तिप्पट भाव मिळत असल्याचेही संजय सांगतो.
मोती उत्पादनात शिंपल्यांची उपलब्धता गरजेची आहे, यासाठी मी रोज सकाळी गावाजवळील नदीतून जिवंत शिंपले गोळा करुन घरी आणायचो. त्यावर शस्त्रक्रिया करून मोत्यांचे बिजकण आत सोडायचे आणि साधारण दीड वर्ष देखरेख ठेवायची. असा नित्यक्रम पाळल्यानंतर जवळपास दीड वर्षात परिपक्व मोती हातात येतो. अन्न म्हणून जनावरांच्या विष्टेचा वापर करतो. विशेष म्हणजे हे शिंपले जिवंत असतात. त्यामुळे नियमीत देखरेख ठेवावीच लागते. अन्यथा नुकसान होण्याचा धोका असल्याचेही संजय सांगतो.
वाचाः
बाराशे रूपये कॅरेटने विकला जातो
सुरत, अहमदाबाद, हैदराबाद, मुंबई या शहरांमध्ये मोत्यांची मोठी बाजारपेठ आहे. संजयने उत्पादन घेतलेल्या मोत्यांची गुणवत्ता उच्चप्रतिची असल्याने त्याला बाराशे रूपये कॅरेट इतकी किंमत मिळते. मोत्यांचे वजन कॅरेटमध्ये मोजतात. साधारण एका शिंपल्यात दोन मोती असतात. त्याचा एकूण खर्च ७० रूपये इतका येतो. त्यातून ३ ते ५ हजारापर्यंत उत्पन्न मिळतं. एका हंगामात जवळपास ५ हजार शिंपले टॅंकमध्ये टाकले जातात. योग्य देखरेख ठेवल्यास त्यातील जवळपास ४ हजार वाचतात. कुठेही चूक झाल्यास शिंपल्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत नुकसान देखील होवू शकते त्यामुळे या व्यवसायात मोठी जोखीम देखील असल्याचेही संजयने सांगितले.
आधुनिक शेतीच पर्याय
मोत्यांच्या शेतीसोबत संजय आधुनिक शेती बद्दल अधिक जागरूक आहे. ‘या भागात पारंपारिक भात पिकाचे उत्पादन घेतल्या जाते मात्र, यातून पाहिजे तेव्हढे उत्पन्न होत नाही. म्हणून माझ्या १ एकर शेतात मोठ्या प्रमाणात चंदनाची लागवड केली आहे. सोबतच फळबाग व भाजीपाला देखील पिकवितो. पारंपारिक शेती बद्दलचे संजयचे मत वेगळे आहे. शेतकर्यांना आर्थिक संपन्नता मिळवायची असल्यास आधुनिक शेतीच हाच पर्याय असल्याचेही तो सांगतो.
The assignment submission period was over and I was nervous, casinocommunity and I am very happy to see your post just in time and it was a great help. Thank you ! Leave your blog address below. Please visit me anytime.
As I am looking at your writing, baccarat online I regret being unable to do outdoor activities due to Corona 19, and I miss my old daily life. If you also miss the daily life of those days, would you please visit my site once? My site is a site where I post about photos and daily life when I was free.