दोन लाटांनंतर करोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. या सगळ्याचा राज्याच्या अर्थकारणावर कुठेतरी परिणाम होत असतो. अशा परिस्थितीमध्येही परिवहनमंत्री आणि एसटीच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना शक्य तितके जास्त देण्याचा प्रयत्न केला आहे

शरद पवार एस.टी

शरद पवार आणि अनिल परब यांनी सोमवारी सह्याद्री अतिथीगृहावर एसटी कर्मचाऱ्यांच्या २२ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना सामोपचाराची भूमिका घेऊन संप मागे घेण्याचे आवाहन केले.

हायलाइट्स:

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर जवळपास सर्व एसटी संघटनांच्या प्रमुखांनी संप मागे घेण्याची तयारी दर्शविली आहे.
  • शरद पवार आणि अनिल परब यांनी सोमवारी सह्याद्री अतिथीगृहावर एसटी कर्मचाऱ्यांच्या २२ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला

मुंबई : आपली बांधिलकी ही प्रवाशांशी आहे, ही बाब एसटी कर्मचाऱ्यांनी ध्यानात ठेवावी. राज्य सरकार तुमच्या मागण्यांविषयी सकारात्मक आहे. मागण्या करण्यात काहीही गैर नाही. पण मागण्या मांडताना कुठपर्यंत जावं, याचं तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. एसटी कृती समितीतील संघटनांनी हे तारतम्य बाळगत संप मागे घेण्याची हाक दिली आहे. परिवहनमंत्र्यांनीही मागणयांविषयी सकारात्मक भूमिका दाखवली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी या सगळ्याचा गांभीर्याने विचार करत संप मागे घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.

शरद पवार आणि अनिल परब यांनी सोमवारी सह्याद्री अतिथीगृहावर एसटी कर्मचाऱ्यांच्या २२ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना सामोपचाराची भूमिका घेऊन संप मागे घेण्याचे आवाहन केले. गेल्या दोन महिन्यांत एसटीच्या संपामुळे राज्यातील प्रवाशांचे मोठ्याप्रमाणावर हाल झाले आहेत. दोन लाटांनंतर करोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. या सगळ्याचा राज्याच्या अर्थकारणावर कुठेतरी परिणाम होत असतो. अशा परिस्थितीमध्येही परिवहनमंत्री आणि एसटीच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना शक्य तितके जास्त देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा प्रयत्न याठिकाणी कृती समितीच्या लोकांसमोर मांडल्यानंतर कृती समितीचेही काही प्रश्न आहेत, सरकारच्या निर्णयामध्ये काही कमतरता आहेत, हे कृती समितीने निवेदन आणून दिलं. त्याही बाबत सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी मंत्रीमहोदयांनी दाखवली, असे शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी कामावर पुन्हा रुजू होत एसटी सुरळीत कशी चालेल, हे पाहावे, असेही पवार यांनी म्हटले.
शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक, एसटी संघटनांच्या प्रमुखांची बांधली मोट , कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन
गेल्या ३०-४० वर्षांमध्ये एसटीचा संप झाला तेव्हा त्यांच्या प्रतिनिधींशी मी अनेकदा चर्चा केली आहे. दरवेळी एसटी कर्मचाऱ्यांचा प्रवाशांविषयीचा दृष्टीकोन विधायकच असल्याचे मला दिसले आहे. मागण्या करण्यात काही चूक नाही. परंतु, त्या मांडताना कुठपर्यंत जावं, याचं तारतम्य ठेवलं पाहिजे. मात्र, यावेळी पहिल्यांदाच काहीजणांनी एसटी संघटना आणि सरकारने कामगारांच्या भल्यासाठी भूमिका घेऊनही ऐकायचेच नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे मागण्या मान्य करुनही राज्य सरकारला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अन्यथा हा संप दोन महिने रेंगाळलाच नसता, असे शरद पवार यांनी म्हटले.

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एमएसआरटीसी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here