हायलाइट्स:

  • पोलीस ठाण्यासमोरच मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न
  • नाशिक शहरातील धक्कादायक घटना
  • पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात

नाशिक : शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असताना आज आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. चक्क पोलीस ठाण्यासमोरूनच मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (नाशिक क्राईम ताज्या बातम्या)

शहरातील मार्केट यार्ड परिसरात एक मुलगी आपल्या काकांसोबत पायी चालत असताना काही गुंडांनी तिची छेड काढत अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीसोबत असलेल्या काकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत त्यांच्याशी दोन हात केले आणि घाबरलेल्या मुलीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी मदतीला धावून आल्याने अपहरणकर्त्यांचा डाव फसला.

राजकीय वाद जळगावात; चर्चा ठाणे आणि पुण्याची! वाचा नेमकं काय घडलं?

या घटनेत पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई करण्यात येत आहे. पोलीस ठाण्यासमोरच अपहरणाचा प्रयत्न झाला असल्याने आता नाशिक शहरात महिला व मुली किती सुरक्षित आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, दिवसेंदिवस शहरातील गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. चोरी, अपहरण, विनयभंग, चेन स्नॅचिंग अशा घटना वाढत असल्याने महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. एकीकडे शहर पोलीस वेगवेगळ्या मोहिमा राबवत असताना दुसरीकडे मात्र गुन्हेगारीचा आलेख मात्र वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here