हायलाइट्स:
- दागिने चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
- बारामती तालुका पोलिसांनी केली अटक
- तपासात धक्कादायक माहिती उघड
बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी मध्यरात्री शिर्सुफळ या गावात असलेल्या शिरसाई मंदिरातील देवीच्या अंगावरील दागिने व मंदिरातील इतर वस्तू चोरीस गेल्या होत्या. बारामती तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत २४ तासांच्या आतच आरोपींना अटक केली. शाहरूख राजू पठाण, पुजा जयदेव मदनाळ, अनिता गोविंद गजाकोश अशी आरोपींची नावं आहेत.
शिरसाई माता मंदिरातील चोरीसह नागपूर, वर्धा, लातूर, बीड, उस्मानाबाद, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील वेगवेगळया जवळपास २० ते २५ मंदिरातील दागिने व इतर साहित्य चोरल्याची कबुली या आरोपींनी दिली आहे. आरोपीकडून आतापर्यंत शिरसाई माता मंदिरात चोरीस गेलेले सर्व दागिने व पितळी वस्तूसह महाराष्ट्रातील इतर मंदिरातून चोरी केलेले दागिने, वस्तू तसंच पिंपरी येथून चोरी केलेल्या चारचाकी वाहनासह जवळपास १२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दरम्यान, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईबाबत माहिती दिली.