हायलाइट्स:

  • अमेरिकेच्या ग्रीन बे भागातील घटना
  • रेस्क्यू टीमकडून सर्व नागरिकांची सुखरुप सुटका
  • अडकलेल्या पर्यटकांचा प्राण कंठाशी

वॉशिंग्टन, अमेरिका :

अमेरिकेत समुद्रातटापासून अलग झालेल्या बर्फाच्या एका तुकड्यावर तब्बल ३४ जण अडकून पडल्याची घटना घडली. या सर्वांची रेस्क्यू टीमकडून सुखरूप सुटका करण्यात आल्यानंतर सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

गोठलेल्या समुद्राच्या एका भागावर हे पर्यटक दाखल झाले होते. मात्र, अचानक हा विशाल बर्फाचा तुकडा जमिनीपासून वेगळा झाला… आणि उसळत्या लाटांसोबत समुद्रात जवळपास एका मैलाच्या अंतरावर फेकला गेला अन् या बर्फाच्या तुकड्यावर अडकून पडलेल्या प्रवाशांचा प्राण कंठाशी आला.

समुद्रकिनाऱ्यावर हा प्रकार आपल्या डोळ्यांनी पाहणाऱ्या काही प्रत्यक्षदर्शींनी तातडीनं याची सूचना पोलिसांनी दिली. पर्यटनासाठी आणि मासे पकडण्यासाठी अनेक जण या बर्फाच्या तुकड्यावर उतरले होते. याच दरम्यान एक मोठा आवाज झाला आणि बर्फाचा विशाल तुकडा तटापासून विलग झाला. पाहता पाहताच तो समुद्रात काही अंतरावर फेकला गेला… यावेळी या बर्फाच्या तुकड्यावर उभे असलेले लोक जिवाच्या आकांतानं ओरडत होते.

Watch Video : तलावात विहार करणाऱ्या बोटींवर अचानक कोसळला डोंगराचा कडा!
न्यूयॉर्कमध्ये इमारतीला आग! नऊ मुलांसहीत १९ जणांचा मृत्यू
विस्कॉन्सिनमधील ब्राउन काउंटी शेरिफ कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, ग्रीन बे मधील ‘पॉइंट कम्फर्ट’च्या किनार्‍यावर तरंगत्या हिमखंडावर लोक अडकून पडल्याची सूचना मिळाली होती. त्यानंतर लगेचच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं. जवळपास दोन तासांच्या बचाव मोहिमेनंतर या बर्फाच्या विशाल तुकड्यावर अडकलेल्या ३४ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. सुदैवानं, या घटनेत कुणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा बर्फाचा तुकडा जमिनीपासून विलग होण्याच्या अगदी काही वेळ अगोदर व्यक्ती आणि सामान घेऊन जाणारं एक जहाज या भागातून प्रवासाला निघालं होतं. कदाचित या जहाजाच्या हालचालींमुळे गोठलेला बर्फ अस्थिर झाला आणि तटापासून विलग होऊन तो समुद्राच्या पाण्यात आत ढकलला गेला.

समुद्रात फेकला गेलेला बर्फाचा हा विशाल तुकडा पाण्यात तसाच राहिला. परंतु, समुद्रातील प्रवाही लाटांच्या वेगामुळे या बर्फावर उभ्या राहिलेल्या लोकांना उभं राहण्यासाठीही आधार मिळत नव्हता. बर्फाचा तुकडा समुद्राकडे जाताना पाहून अनेकांना आपला मृत्यू समोर दिसत होता.

Afghanistan Crisis: तालिबानी मंत्री आणि पंजशीर नेता अहमद मसूद यांची इराणमध्ये भेट?
अजब-गजब! कब्रस्तानात पार पडलं जोडप्याचं प्री-वेडिंग फोटोशूट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here