हायलाइट्स:
- दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात
- अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू
- आणखी एक जण जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी आठ वाजताच्या सुमारास उंब्रज येथे आयटीआयची परीक्षा देण्यासाठी दुचाकीवरून दोन तरुण निघाले होते. यावेळी झालेल्या अपघातात ऋषिकेश चंद्रकांत गोळे याचा अपघातामध्ये झाला. या घटनेनं गोळेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
ऋषिकेश हा पाचगणी येथील गोडोली औद्योगिक प्रशिक्षण केंद्र संस्था येथे आयटीआयचे शिक्षण घेत होता. त्याची परीक्षा उंब्रज येथे आज होती. त्याच्याबरोबर आयटीआयचे शिक्षण घेणारा अविनाश गोळे देखील परीक्षेला जात होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे.
दरम्यान, या अपघाताची नोंद महामार्गावरील बोरगाव पोलीस स्थानकामध्ये झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.