हायलाइट्स:

  • बिबवेवाडीत इंजिनिअरने एकाचा चाकूने भोकसून केला खून
  • कचऱ्याच्या वादातून घडली घटना
  • घटनेनं परिसरात उडाली खळबळ

पुणे : पुण्यातील बिबवेवाडीत सुखसागर नगर परिसरात सुरू असलेल्या बांधकामाचा कचरा शेजारच्या घरावर पडल्यामुळे झालेल्या वादातून इंजिनिअरने रागाच्या भरात एकाच्या छातीत चाकू भोसकून खून केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी इंजिनिअरला अटक केली आहे. (पुणे क्राईम न्यूज)

शरद सीताराम पुरी (वय ३५, रा.सुखसागर नगर भाग दोन, बिबवेवाडी) असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. बिबवेवाडी पोलिसांनी आरोपी सचिन विठ्ठल कपटकर (वय ४६, रा. घर नंबर २४६, सुखसागर नगर भाग दोन, लेन नंबर पाच बिबवेवाडी पुणे) याला अटक केली आहे.

ICMR New Covid Guidelines: करोना चाचणी नेमकी कुणाची करावी?; ICMRने निकष बदलले, आता फक्त…

बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडीत सुखसागर नगर भाग दोनमध्ये पुरी आणि कपटकर शेजारी-शेजारी राहण्यास आहेत. पुरी हे व्यावसायिक असून कपटकर हा इलेट्रिकल इंजिनिअर आहे. सध्या त्याला कोणताही कामधंदा नव्हता. त्याच्या घराशेजारीच पुरी यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. त्या बांधकामाचा कचरा कपटकर याच्या घरावर पडत होता.

Sonu Sood: सोनू सूदची पंजाबमध्ये मोठी राजकीय खेळी!; काँग्रेस प्रवेश टाळला आणि…

कपटकर यांच्या घरावर कचरा पडल्याने या दोघांमध्ये भांडणे होत होती. सोमवारी सकाळी देखील त्यांच्यात याच कारणावरून वाद झाले. त्यावेळी आरोपी कपटकर याने रागाच्या भरात पुरी यांच्या छातीत चाकू भोकसला. यामध्ये गंभीर जखमी होऊन पुरी यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी कपटकर याला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here