सचिन गोवर्धन (वय ३६ ), असे मृताचे नाव असून त्याने मोबाइलवरून पत्नीशी संपर्क साधून नंतर आत्महत्या केली. सचिन वाहनचालक होता. २०१५ मध्ये सचिनचे सलोनी (वय २६) हिच्यासोबत लग्न झाले होते. दोघांना दोन वर्षांची मुलगी आहे. सचिनला दारूचे व्यसन असल्याने सचिन व सलोनी यांच्यात नेहमी वाद व्हायचे. गेल्या काही दिवसांपासून सचिन हा सलोनीच्या चारित्र्यावर संशय घ्यायला लागला. तो तिला मारहाणही करायला. त्याच्या या त्रासाला कंटाळून सलोनी ही मुलीसह माहेरी निघून गेली. त्यानंतर तो तिला परत बोलावत होता मात्र, सलोनीने त्यास नकार दिला. या साऱ्या घटनाक्रमातूनच शुक्रवारी सायंकाळी सचिनने टोकाचे पाऊल उचलले. सचिनने सलोनीच्या मोबाइलवर संपर्क साधला. ‘एटीएम व आलमारीची चावी वहिनीकडे ठेवली आहे. तू सुखी रहा’, असे सांगून सचिनने पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला.
दरम्यान, सचिनचा भाऊ घरी आला असता दरवाजा बंद होता. आवाज दिला अशता प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर खिडकीतून डोकावले असता सचिनने गळफास घेतल्याचे दिसले आणि सचिनचा भाऊ हादरूनच गेला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला असून एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times