परभणी : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत उपस्थित असलेले, गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांना करोनाची लागण झाली असल्याची माहिती आहे. त्यांना लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी स्वतःची करोना चाचणी केली असता त्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

विशेष बाब म्हणजे गंगाखेड येथे काल रेल्वे उड्डाणपुलाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री अशोक चव्हाण, खासदार संजय जाधव यांच्यासह आमदार अमर राजूरकर, आमदार बाबाजानी दुरांनी, आमदार सुरेश वरपूडकर, आमदार डॉ. राहुल पाटील, जितेश अंतापुरकर, माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे आदींसह मोठ्या प्रमाणात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

मराठवाड्याची राजधानी तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर?; आज तब्बल एवढे रुग्ण सापडले

कार्यक्रम संपल्यानंतर अशोक चव्हाण यांच्यासह सर्वच नेतेमंडळीमंडळींनी रत्नाकर गुट्टें यांच्या घरी जेवणही केले. त्यामुळे आता प्रशासनाची चिंता वाढली आहे. मात्र, संपर्कात असलेल्यांनी करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन आमदार गुट्टे यांनी केले आहे.

Molnupiravir: मोलनुपिरावीर गोळी करोनावर रामबाण ठरेल?; एम्सच्या डॉक्टरने मांडले ‘हे’ मत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here