औरंगाबाद : करोनाच्या वाढत प्रादुर्भाव पाहता नागरिकांच लसीकरण होणं महत्वाचं आहे. त्यामुळे नागरिकांच्या लसीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना सर्वच जिल्ह्यांना राज्य आणि केंद्र सरकारकडून वारंवार दिल्या जात आहे. मात्र, असे असताना औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणाला विशेषत: दुसऱ्या डोसला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया व राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी याबाबत नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती.

जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४१ टक्केच लोकांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. तर जिल्ह्यात १८ वर्षांवरील ३४ लाख ३८ हजार ५०० लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र त्यापैकी २७ लाख १२ हजार जणांनी पहिला तर १४ लाख १३ हजार जणांनी दुसरा डोस घेतला आहे. २० लाख लोक अजूनही दुसऱ्या डोसपासून दूर आहेत. त्यामुळे यावरून आरोग्य मंत्री यांनी नाराजी व्यक्त करत, लसीकरण वाढविण्यासाठी काही सूचना केल्या आहेत.

राज्याची चिंता वाढली, ज्या आमदाराच्या घरी केलं जेवण त्याचा २४ तासात रिपोर्ट पॉझिटिव्ह
‘औरंगाबाद पॅटर्न’ची नुसतीच चर्चा…

जिल्ह्यातील लसीकरण वाढावा यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काही कठोर निर्णय घेऊन लसीकरणाचा आलेख वाढवला होता. त्यामुळे ‘औरंगाबाद पॅटर्न’ची मोठी चर्चा झाली होती. पण पुढे या निर्णयाची योग्य अमलबजावणी झालीच नसल्याने लसीकरण मोहीम पुन्हा संत गतीवर आली. त्यामुळे चव्हाण यांच्या ‘औरंगाबाद पॅटर्न’ची नुसतीच चर्चा झाली, पण प्रत्यक्षात लसीकरणाचे आकडे काही वाढताना दिसत नसल्याचीही चर्चा आहे.

ऑरेंज सिटी की पोस्टर सिटी? जाहिरातींनी विद्रुप केलं शहर; कठोर कारवाईची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here