नागपूर सिटी न्यूज़: ऑरेंज सिटी की पोस्टर सिटी? जाहिरातींनी विद्रुप केलं शहर; कठोर कारवाईची मागणी – advertisements deface nagpur city demand for strict action
नागपूर : आपले शहर स्वच्छ आणि सुंदर असावे, यासाठी स्थानिक विकास प्राधिकरणाकडून विविध योजना राबविण्यात येतात. स्मार्ट सिटी प्रकल्पही मनपाने हाती घेतला आहे. एकीकडे असे प्रयत्न सुरू असताना शहर विद्रुप करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. आपली संस्था, कंपनीची जाहिरात करण्यासाठी मिळेत त्या जागेवर पोस्टर चिटकविले जात असल्याने राज्याची उपराजधानी असलेले नागपूर शहर ‘ऑरेंज सिटी की पोस्टर सिटी’ अशी खंत शहरवासी व्यक्त करीत आहेत.
शहरात कुठेही सार्वजनिक ठिकाणी जाहिरात लावायची असेल तर स्थानिक विकास प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते. मात्र अनेक जण अशी प्रक्रिया पूर्ण न करता आपल्या उत्पादन वा सेवेबद्दलची माहिती देणारे पोस्टर छापून दिसेल त्या जागेवर चिटकवतात किंवा लावतात. या पोस्टरवर त्या संस्थेचे नाव मोबाइल क्रमांकासह असते. त्यामुळे प्रशासनाने शहर विद्रुप करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शाळेची इमारत, इलेक्ट्रिक डीपी, रुग्णालयांच्या भिंतीच नव्हे तर ऑक्सिजन देणाऱ्या झाडांवरही मोठ्या प्रमाणात अशा जाहिराती चिटकविण्यात आल्या असल्याचे चित्र शहराच्या विविध भागांत दिसून येत आहेत. राज्याची चिंता वाढली, ज्या आमदाराच्या घरी केलं जेवण त्याचा २४ तासात रिपोर्ट पॉझिटिव्ह यामुळे झाडांचे मरण
‘झाडे सजीव आहेत’, असे आपल्याला शालेय अभ्यासक्रमापासूनच शिकविल्या गेले. असे असतानाही पोस्टर, जाहिराती लावण्यासाठी या झाडांना खिळे ठोकणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. या प्रवृत्तींमुळे शहरातील वृक्षसंपदा धोक्यात आली आहे. जाहिरातीचे होर्डिंग दिसावे म्हणून रविनगर येथील वटवृक्ष बेकायदेशीररीत्या तोडण्याचा प्रकार अलीकडेच ‘मटा’च्या वृत्तामुळे पुढे आला होता. कारवाईची भाषा करणाऱ्या प्रशासनाने अद्यापही दोषींवर ठोस कारवाई केली नसल्याचा रोष पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त होत आहे. मात्र प्रशासनाने वेळीत दखल न घेतल्यास शहर सौंदर्यीकरण केवळ नावालाच राहील, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. झाडांवर ठोकलेले खिळे कालांतराने गंजतात. तो गंज झाडाच्या बुंध्यात उतरतो. परिणामी झाडावर हळूहळू परिणाम होऊन झाड खंगत जाते. शहर विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत अशा लोकांविरोधात महापालिकेने कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विलास ठोसर यांनी केली आहे.