औरंगाबाद : गेल्या काही वर्षात तरुणांमध्ये मोबाईलचा क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच इंटरनेट सहज उपलब्ध होत असल्याने तरुण पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे. दरम्यान औरंगाबादमध्ये याच मोबाईलच्या आहारी गेलेल्या एका २१ वर्षीय तरुणाने घरच्यांनी मोबाईल रिचार्जसाठी पैसे दिले नाही म्हणून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील रहाटगाव येथील ही घटना आहे.
अक्षयने आत्महत्या केल्याची घटना सोमवार रोजी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे पैठण पोलीस ठाण्यात सदरील मृत्यूप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करून पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार विठ्ठल एडके हे करीत आहे.