मुंबई आणि महाराष्ट्रात जे कार्य करोना महामारीशी लढण्याबाबत सुरू आहे ते देशात पहिल्या क्रमांकाचे आहे. तेव्हा उगाच जळफळाट करून खुसपटे काढण्यापेक्षा या सत्कार्याला हातभार लावून लोकांची सेवा करा.

संजय राऊत (१)

समाजाला लागलेली ही कीड आहे. चांगले चाललेले बघवले न जाण्याची पोटदुखी आहे, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

हायलाइट्स:

  • मुंबईत अद्ययावत कोविड सेंटर्स उभारून लोकांना सेवा दिली जात आहे
  • भाजपाच्या काही नाचे मंडळींचा त्यावर आक्षेप असून ते जमिनीवर काठ्या आपटून ‘साप साप’ म्हणून बोंबलत फिरत आहेत

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या कोव्हिड सेंटरची कंत्राटे ही शिवसेनेच्या नेत्यांना देण्यात आली आहेत. या माध्यमातून कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांवर ‘सामना’तून खरमरीत शब्दांत टीका करण्यात आली आहे. करोनावर नियंत्रण आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय उत्तमप्रकारे काम करत आहेत. परंतु, मुंबईतील भाजपच्या नाच्यांनी करोनाच्या या लढाईत अपशकून करु नव्हे, असा घणाघात शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या उपाययोजनांत भ्रष्टाचार सुरु आहेत, घोटाळे सुरु आहेत, असे आरोप महाराष्ट्रातून कोणी केले नाहीत. राजकारण करायचेच तर कोठेही करता येईल, पण ती महाराष्ट्राची नियत नाही. मुंबई-महाराष्ट्रात करोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार उपाययोजना करीत आहे. मुंबईत अद्ययावत कोविड सेंटर्स उभारून लोकांना सेवा दिली जात आहे. लोकांचे प्राण वाचविले जात आहेत. यावरही भाजपाच्या काही नाचे मंडळींचा त्यावर आक्षेप असून ते जमिनीवर काठ्या आपटून ‘साप साप’ म्हणून बोंबलत फिरत आहेत. “या नाचे मंडळींना नवाब मलिक यांनी कडक उत्तर दिले आहे. या नाचे मंडळींना गाय दूध देते हे दिसत नाही, तर फक्त शेण दिसते. खरेतर आता गाईच्या शेणातूनही अनेक ‘उपचार’ पद्धती सुरू झाल्या आहेत व शेणापासून इतर अनेक उपयुक्त उपक्रम संघ परिवाराच्याच गोशाळेत सुरू केले आहेत, या टोणग्यांना हे समजणार कधी? समाजाला लागलेली ही कीड आहे. चांगले चाललेले बघवले न जाण्याची पोटदुखी आहे, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
किरीट सोमय्यांना म्हैस दूध देतेय हे दिसतच नाही, ते नेहमी शेणंच पाहतात: नवाब मलिक
मुंबई आणि महाराष्ट्रात जे कार्य करोना महामारीशी लढण्याबाबत सुरू आहे ते देशात पहिल्या क्रमांकाचे आहे. तेव्हा उगाच जळफळाट करून खुसपटे काढण्यापेक्षा या सत्कार्याला हातभार लावून लोकांची सेवा करा. तेवढेच पुण्य पदरी पडेल, पण जे चांगले सुरू आहे त्यावर चिखलफेक करायची, यापेक्षा वेगळे उद्योग त्यांचे दिसत नाही. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली कोव्हिडची लढाई राज्यांनी पुढे न्यावी. देशाला लाभलेले सध्याचे आरोग्यमंत्री मनसुख मांडवियाही उत्तम काम करत आहेत. निदान मुंबईतील भाजपच्या नाच्यांनी त्यांना अपशकून करु नये, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: कोविड सेंटरवर भ्रष्टाचाराचे आरोप करून भाजप नेत्यांनी कोरोनाच्या लढाईचे राजकारण करू नये : शिवसेना
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here