राज्यातील २२ एसटी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी शरद पवार आणि अनिल परब यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर एसटी संपावर तोडगा निघण्याचा मार्ग दृष्टीपथात आल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी एक व्हीडिओ जारी करुन महाविकासआघाडी सरकारवर तोफ डागली.

राज्यातील २२ एसटी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी शरद पवार आणि अनिल परब यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर एसटी संपावर तोडगा निघण्याचा मार्ग दृष्टीपथात आल्याची चर्चा होती
हायलाइट्स:
- तुम्ही आझाद मैदानात जाऊन एसटी कर्मचाऱ्यांशी थेट चर्चा का करत नाही?
- तुमच्यावर बडतर्फीची कारवाई होणार नाही, असे त्यांना आश्वस्त करा.
राज्यातील २२ एसटी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी शरद पवार आणि अनिल परब यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर एसटी संपावर तोडगा निघण्याचा मार्ग दृष्टीपथात आल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी एक व्हीडिओ जारी करुन महाविकासआघाडी सरकारवर तोफ डागली. एसटी संपाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी परिवहनमंत्री अनिल परब सर्व दरवाजे ठोठावत आहेत. त्यापेक्षा तुम्ही आझाद मैदानात जाऊन एसटी कर्मचाऱ्यांशी थेट चर्चा का करत नाही? तुमच्यावर बडतर्फीची कारवाई होणार नाही, असे त्यांना आश्वस्त करा. जेणेकरुन चर्चेचा मार्ग मोकळा होईल, असे गोपीचंद पडळकर यांनी व्हिडीओत म्हटले आहे.
तसेच गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही त्यांच्या वचनाची आठवण करुन दिली. एखादा मोर्चा मुंबईत आला तर माझा मंत्री त्याला सामोरा जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. आता उद्धव ठाकरे यांनी हा शब्द पाळावा. राज्य सरकारने दोन पावलं पुढे जाऊन एसटी कर्मचाऱ्यांची आपुलकीने समजूत काढावी. एसटी संपावर तोडगा काढावा, असेही पडळकर यांनी म्हटले.
शरद पवारांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
आपली बांधिलकी ही प्रवाशांशी आहे, ही बाब एसटी कर्मचाऱ्यांनी ध्यानात ठेवावी. राज्य सरकार तुमच्या मागण्यांविषयी सकारात्मक आहे. मागण्या करण्यात काहीही गैर नाही. पण मागण्या मांडताना कुठपर्यंत जावं, याचं तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. एसटी कृती समितीतील संघटनांनी हे तारतम्य बाळगत संप मागे घेण्याची हाक दिली आहे. परिवहनमंत्र्यांनीही मागणयांविषयी सकारात्मक भूमिका दाखवली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी या सगळ्याचा गांभीर्याने विचार करत संप मागे घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून