Jalna News Today Charges Filed Against Two Men Carrying Swords | खंजर घेऊन उभा असताना पोलिसांनी पकडलं, घरी झडती घेतली अन् पोलिसही हादरले | Maharashtra Times
जालना : सदर बाजार जालना पोलिसांचे पथक काल बस स्थानक परीसरात गस्त घालत असताना त्यांना माहीती मिळाली की, दर्गा समोर एक व्यक्ती धारधार खंजर बाळगुन उभा आहे. या खात्रीशीर माहितीच्या आधारावर पोलिसांनी तात्काळ सदर व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने कमरेला खोचलेले धारधार खंजर सापडले. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी आपल्या स्टाईलने अधिक चौकशी केली असता सदर आरोपीच्या घरी माळशेंद्रा इथे धारधार तलवार असल्याची माहिती आरोपीने सांगितली. इतकंच नाहीतर त्याच तलवारीने केक कापून त्याने लहान मुलाचा वाढदिवस साजरा केल्याचंही कबूल केलं. पोलिसांनी तडक माळशेंद्रा इथे जाऊन आरोपीने शेतामध्ये लपवून ठेवलेली तलवारही जप्त केली आहे. यानंतर आरोपी परमेश्वर नामदेव जाधव वय २२ वर्ष रा. माळशेंद्रा ता. जालना यांच्यासह दोन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ‘या’ जिल्हाधिकाऱ्यांवर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनंतर आता आरोग्यमंत्रीही नाराज मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीकडून एक धारधार तलवार आणि एक धारधार खंजर असा २५०० रुपयांचा ऐवज जप्त केल्याने मुलाचा वाढदिवस तलवारीने केक कापून साजरा करणं या आरोपीच्या चांगलेच अंगलट आलं आहे.