हायलाइट्स:
- करोना रुग्णसंख्येच्या उसळी दरम्यान खुशखबर!
- ‘पी फायझर’ची ओमिक्रॉनला लक्ष्य करणारी लस लवकरच येणार
- ओमिक्रॉनमुळे वाढणारा आरोग्य व्यवस्थेवरचा ताण कमी होणार?
भारतासहीत जगभरात करोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉननं तेजीनं हात-पाय पसरलेले दिसून आलेत. ओमिक्रॉनमुळे लसीकरण पूर्ण करणाऱ्या रुग्णांच्या जिवाला अधिक धोका नसल्याचं जरी समोर आलं असलं तरी वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सुविधांवर निर्माण होणारा ताण दुर्लक्षित केला जाऊ शकत नाही. याच धोक्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशांनी नागरिकांना करोना लसीचा ‘बुस्टर डोस’ देण्याचा निर्णय घेतलाय. दुसरीकडे, ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्याच्या उद्देशानं लसनिर्मितीवरही काम सुरू आहे.
अनुभवी फार्मा कंपनी ‘फायझर’ क्र.फायझर) नुकतीच एक खुशखबरी दिलीय. ओमिक्रॉन व्हेरियंटला मात देणारी कोविड-१९ ग्लूटेन येत्या मार्च महिन्यापर्यंत तयार होऊ शकेल, असा विश्वास फायझरकडून व्यक्त करण्यात आलाय. कंपनीच्या प्रमुखांनी सोमवारी ही माहिती दिलीय.
कोविड-१९ बाधित रुग्णसंख्येत सतत वाढ होत असताना सरकारकडून मोठ्या प्रमाणात लसीची मागणी समोर येतेय. त्यामुळे पी फायझरकडून जास्ताीत जास्त प्रमाणात लसीचे डोस तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उल्लेखनीय म्हणजे, लसीकरण पूर्ण झाल्यानंतरही ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झालेल्या रुग्णांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे, असं ‘फायझर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अलबर्ट बौर्ला यांनी ‘सीएनबीसी’शी बोलताना म्हटलंय.
ओमिक्रॉनवर नियंत्रण मिळवणारी लस येत्या मार्च महिन्यापर्यंत तयार होईल. याची आवश्यकता लागेल किंवा नाही किंवा भविष्यात ही लस कशी वापरली जाईल, या सगळ्याच गोष्टी सध्या अनिश्चित स्वरुपात आहेत, अशी भावनाही बौर्ला यांनी यावेळी व्यक्त केली.
सध्या, करोना लसीचे दोन डोस आणि एका बुस्टर डोसद्वारे रुग्णांनी करोनापासून होणाऱ्या संभाव्य धोक्यांविरुद्ध ‘वाजवी’ संरक्षण मिळतंय. मात्र, ‘ओमिक्रॉन’ व्हेरियंटला थेट लक्ष्य करणारी लस ‘स्ट्रेन’च्या अत्याधिक संसर्गापासूनही संरक्षण देऊ शकेल, असा विश्वास फायझरच्या सीईओंनी व्यक्त केला आहे.