औरंगाबाद : वेबसाईटवर आय-डी तयार करुन क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तीन बुकींच्या गुन्हे शाखा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई रविवारी रात्री जिन्सी भागात करण्यात आली. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या बुकींकडून पोलिसांनी रोख, बेटिंगसाठी वापरलेले मोबाईल असा ७५ हजारांचा ऐवज जप्त केला. सय्यद रियाज सय्यद शकील (३८, रा. गल्ली क्र. १४, बायजीपुरा), तरबेज खान कलीम खान (३०, रा. आलमगीर कॉलनी), शेख मुजाहिद शेख शाहरुख (३०, रा. मिसारवाडी) अशी अटकेतील बुकींची नावे आहेत.

‘या’ जिल्हाधिकाऱ्यांवर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनंतर आता आरोग्यमंत्रीही नाराज
क्रिकेट सामन्यावर सय्यद रियाज हा सट्टा घेत असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पथकाने रियाजच्या घरावर छापा मारला. एका संकेतस्थळावर वैयक्तिक आयडी बनवून तो त्याआधारे सिडनी सिक्सर विरुद्ध पर्थ स्क्रोच या संघाच्या क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजांकडून सट्टा घेत असल्याचे समोर आले. रियाजने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी आलमगीर कॉलनीतून इतर दोन बुकींना अटक केली.

या सामन्यावरील सट्टा घेण्यासाठी लागणारा आय-डी नाशिक येथील सद्दाम शेख याने तयार केला होता. अशी माहिती पोलिसांना तिघांनी दिली आहे. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी रोख ४७ हजार ५०० रुपये आणि मोबाईल असा ७५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक गजानन सोनटक्के, सहायक फौजदार सतीश जाधव आदींनी कारवाई केली.

खंजर घेऊन उभा असताना पोलिसांनी पकडलं, घरी झडती घेतली अन् पोलिसही हादरले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here