औरंगाबाद : गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेले आहेत. त्यामुळे आधीच तोट्यात असलेलं एसटी महामंडळ आता आणखी डबघाईला आलं आहे. त्यामुळे याचा फटका आता एसटीवर अवलंबून असलेल्या इतर घटकांना बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आगारात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या दोन महिन्यांपासून थकले आहे.

औरंगाबादमध्ये ६० पेक्षा अधिक सुरक्षा कर्मचारी कामावर आहेत. आठ तास ड्युटी केल्यानंतर त्यांना १२ ते १३ हजार पगार हातात पडतो. मात्र संप सुरू झाल्यापासून म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबरच पगार मिळाला नाही. विशेष म्हणजे संप सुरू असतानाही सुरक्षा रक्षक मात्र नेहमीप्रमाणे कामावर हजर होते. त्यामुळे पगार होत नसल्याने सुरक्षा रक्षकांना सुद्धा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

‘या’ जिल्हाधिकाऱ्यांवर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनंतर आता आरोग्यमंत्रीही नाराज
एसटी कर्मचारी संपावर ठाम….

राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार यांनी काल ( सोमवारी ) पत्रकार परिषद घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचं आवाहन केलं. मात्र पवारांच्या या आवाहनाला उत्तर देताना, ‘जोपर्यंत विलिनीकरणाची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचा दुःखवटा ( संप ) सुरूच राहणार,’ अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे पवारांच्या एन्ट्रीनंतर सुध्दा एसटीच्या संपावर तोडगा निघताना दिसत नाही.

धक्कादायक! घरच्यांनी ‘या’ कामासाठी पैसे दिले नाही म्हणून तरुणाचं टोकाचं पाऊल, पोलिसही हादरले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here