हायलाइट्स:
- शरद पवार हे फक्त राज्यातीलच नव्हे तर देशातील अनुभवी नेते आहेत
- त्यांच्या अनुभवाला आणि मताला देशात किंमत आहे
शरद पवार किंवा मी, आम्ही दत्ता सामंत यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईत झालेला गिरणी कामगारांचा संप बघितला आहे. हा गिरणी संप संपल्याचे आजवर कोणीही जाहीर केलेले नाही. त्यामुळे गिरण्यांमधील कामगार देशोधडीला लागले. एवढा अट्टाहास करता कामा नये, असा सल्ला छगन भुजबळ यांनी दिला. तसेच एसटी कामगारांना समजावण्याचा आणि राज्यकर्ते चुकत असतील त्या त्रुटींवर बोट ठेवण्याचा हक्कही शरद पवार यांना असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले. दरम्यान, शरद पवार हे मंगळवारी दुपारी मुंबईत पत्रकारपरिषद घेणार आहेत. या पत्रकारपरिषदेत ते एसटी संपाविषयी काही बोलणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांना शरद पवारांना चर्चा करायला भाग पाडलं: पडळकर
राज्यातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी शेवटपर्यंत एकजूट कायम ठेवल्याने सरकारला मिळणाऱ्या महसूलात घट झाली. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी जाहीरपणे चर्चा करायला भाग पाडले, असे वक्तव्य भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. एसटी कर्मचाऱ्यांनी शेवटपर्यंत एकुजटीने लढा दिला यासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. महसूलात घट आणून तुम्ही शरद पवार यांना तुमच्याशी चर्चा करण्यासाठी भाग पाडलंत, असे पडळकर यांनी म्हटले. तसेच राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी दुसऱ्यांची दारं ठोठावण्यापेक्षा आंदोलकांशी थेट चर्चा करावी, असा सल्लाही पडळकर यांनी दिला.