बीड : सरकारी अधिकाऱ्यांना जिल्ह्यात काम करणं सध्या कठीण झालं आहे. खोट्या बिलावर सह्या करण्यासाठी धमक्या देणाऱ्या गुत्तेदारापासून संरक्षण मिळावं अशी मागणी करण्याची वेळ अधिकाऱ्यांवर येणं हे दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यात माफिया राज बोकाळल्याचा अजून कोणता पुरावा हवाय, याला सत्तेचा पाठिंबा नाही कशावरून? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

अंबाजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागात अनागोंदी कारभार सुरू आहे. कंत्राटदार धमक्या देऊन, कट्यार दाखवून बिलावर सह्या घेतात, त्यामुळे कार्यकारी अभियंता संजय कोकणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तसे पत्र पाठवून संरक्षणासाठी रिव्हॉल्व्हर देण्याची मागणी केली आहे, हे धक्कादायक आहे. वास्तविक पाहता, अशा प्रकारे एखाद्या सरकारी अधिकाऱ्यांवर अशी वेळ येणं खरंच दुर्दैव आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

‘या’ जिल्हाधिकाऱ्यांवर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनंतर आता आरोग्यमंत्रीही नाराज
त्या पुढे म्हणाल्या की, ‘जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्याचे नियंत्रण कसलेही राहिले नाही. त्यामुळेच गेल्या कांही महिन्यांपासून जिल्ह्यात वाळू माफिया, गुटखा माफिया, चोरांना, गुंडांना अभय, खोट्या केसेस दाखल करणे, गुन्ह्यात अडकवणे, व्यापाऱ्यांच्या एजन्स्या हडपणे, चांगल्या संस्थेवर दबाव टाकून प्रशासक आणणे असे प्रकार सत्तेचा गैरवापर करून सर्रास चालू आहेत. गुंडांना पाठिशी घातले जात असून जिल्ह्यात कायद्याचा कसलाही वचक राहिला नाही. त्यामुळे हे लोक आता मर्जीविरुद्ध जाणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत आहेत.’

‘सर्वच विभागातले अधिकारी याला वैतागले असून जिल्ह्यात काम करणे त्यांना कठीण झाले आहे. पण, तक्रार करायला कुणी धजावत नाही. जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांना हेच पाहिजे असल्याने अधिकाऱ्यांवर रिव्हॉल्व्हर मागण्याची वेळ आली आहे. माफियाराज बोकाळल्याचा आणखी कोणता पुरावा हवाय? असा यावेळी सवाल पंकजा मुंडे यांनी केला.

धक्कादायक! घरच्यांनी ‘या’ कामासाठी पैसे दिले नाही म्हणून तरुणाचं टोकाचं पाऊल, पोलिसही हादरले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here