हायलाइट्स:

  • अमेरिकेतील मेरिलँड रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रिया
  • ५७ वर्षीय डेव्हिड बेनेट यांना मिळाली जगण्याची नवी आशा
  • अवयव प्रत्यारोपण प्रकियेत मोठं यश

वॉशिंग्टन, यूएसए:

एका व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शेवटचा उपाय म्हणून त्याच्या अनुवांशिक बदल करत रुग्णाच्या शरीरात एका डुक्कराचं हृदय जोडलं. आजवर केवळ अशक्य वाटणारी ही घटना अमेरिकेच्या मेरिलँड रुग्णालयानं शक्य करून दाखवली आहे.

डेव्हिड बेनेट असं या ५७ वर्षीय रुग्णाचं नाव आहे. डुक्कराचं हृदय जोडण्यात आल्यानंतर रुग्णाची तब्येत व्यवस्थित आहे. शस्त्रक्रियेनंतर तीन दिवसांनी ज्या रुग्णाची तब्येत सुधारतानाही दिसून येतेय. हीच प्रक्रिया भविष्यातही फायदेशीर ठरेल किंवा नाही, याबाबत आत्ताच काहीही सांगणं घाईचं ठरेल, अशी प्रतिक्रिया रुग्णालय प्रशासनानं सोमवारी व्यक्त केली.

मात्र, या शस्त्रक्रियेद्वारे डॉक्टरांनी प्राण्यांचे अवयव मानवामध्ये प्रत्यारोपण करण्याच्या दीर्घकाळापासून सुरू असलेल्या प्रयत्नांत एक पाऊल पुढे टाकलंय.

Omicron Vaccine: ‘ओमिक्रॉन व्हेरियंट’ला लक्ष्य करणारी लस लवकरच, ‘फायझर’ची माहिती
Artificial Sun: चीनच्या ‘कृत्रिम सूर्याचा’ ऊर्जा निर्मितीचा नवा रेकॉर्ड; जगाच्या चिंतेत भर!
‘मेरीलँड मेडिकल सेंटर’च्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या प्रत्यारोपणानं हे सिद्ध केलंय की जनुकीयरित्या बदल करून (जनुकीय सुधारित) प्राण्यांचे हृदय माणसाच्या शरीरात कार्य करू शकतं.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, डुक्कराचं हृदय प्रत्यारोपण केलं जात असल्याची माहिती रुग्णाला अगोदरच देण्यात आली होती. तसंच हा प्रयोग यशस्वी होईल किंवा नाही याची शाश्वती नाही, याची जाणीव आपल्या वडिलांना आहे. परंतु, त्यांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांकडे त्यावेळी दुसरा कोणताही मार्ग नव्हता, अशी प्रतिक्रिया डेव्हिड बेनेट यांच्या मुलानं व्यक्त केलीय.

एका बाजुला मृत्यू आणि दुसऱ्या बाजुला प्रत्यारोपण… असे दोन पर्याय समोर असताना मला जिवंत राहण्याची इच्छा होती. अंधारात बाण मारण्यासारखीच ही परिस्थिती होती. परंतु, माझ्यासाठी हा अखेरचा पर्याय होता, असं बेनेट यांनी म्हटलंय. माहीत आहे, पण तो माझा शेवटचा पर्याय आहे.

प्रत्यारोपणासाठी मानवी अवयवांची कमतरता, हा जगात चिंतेचा विषय आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांकडून आता प्राण्यांचे अवयव वापरण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या वर्षी केवळ अमेरिकेत ३८०० हृदय प्रत्यारोपण करण्यात आले, हा स्वत:च एक विक्रम आहे.

आयशा मलिक… पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश!
Muhammad Khorasani: पाकिस्तानचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मोहम्मद खुरासानी अफगाणिस्तानात ठार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here