वयाच्या चाळीशी-पंचेचाळीशीत असलेले शाखाप्रमुख आणि आणि नगरसेवक ही आदित्य ठाकरे यांची शस्त्रं आहेत. त्यामुळे ज्येष्ठांना डावलणार अशी आवई उठवून या लोकांच्या मनात शिवसेनेविषयी राग निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

 

Aaditya Kishori Pednekar

यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. वयाच्या चाळीशी-पंचेचाळीशीत असलेले शाखाप्रमुख आणि आणि नगरसेवक ही आदित्य ठाकरे यांची शस्त्रं आहेत.

हायलाइट्स:

  • ज्येष्ठांना डावलणार अशी आवई उठवून या लोकांच्या मनात शिवसेनेविषयी राग निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत
  • जेणेकरुन आदित्य ठाकरे यांच्या शस्त्रांची धार बोथट होईल
  • पण शिवसैनिकांना आपल्याला पक्षाने कुठून कुठपर्यंत नेऊन ठेवले, याची जाणीव आहे

मुंबई: ज्या शिवसेनेत मी वाढलेय, त्या पक्षात निवडणुकीचं तिकीट देताना कोणाचीही जात, धर्म किंवा वय बघितले जात नाही. फक्त ती व्यक्ती चांगलं काम करणारी हवी. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत ज्येष्ठ नगरसेवकांचा पत्ता कट होणार, ही केवळ अफवा आहे. ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मनात पक्षाविषयी रोष उत्पन्न करुन आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे सामर्थ्य खच्ची करण्यासाठी अशा बातम्या पसरवल्या जात असल्याचे स्पष्टीकरण महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले. त्या मंगळवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होत्या.

यावेळी किशोरी पेडणेकर यांना आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली लढताना मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत तरुण नेत्यांनी संधी दिली जाणार असल्याच्या चर्चेविषयी विचारण्यात आले. परंतु, किशोरी पेडणेकर यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की, वयाचं काय घेऊन बसलात, तुम्ही मनाने तरुण राहिलं पाहिजे. मुंबईत शिवसेनेचे मनाने ‘तरुण’ असलेले नगरसेवक उत्तमरित्या काम करत आहेत. यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. वयाच्या चाळीशी-पंचेचाळीशीत असलेले शाखाप्रमुख आणि आणि नगरसेवक ही आदित्य ठाकरे यांची शस्त्रं आहेत. त्यामुळे ज्येष्ठांना डावलणार अशी आवई उठवून या लोकांच्या मनात शिवसेनेविषयी राग निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जेणेकरुन आदित्य ठाकरे यांच्या शस्त्रांची धार बोथट होईल. पण शिवसैनिकांना आपल्याला पक्षाने कुठून कुठपर्यंत नेऊन ठेवले, याची जाणीव आहे. त्यामुळे पक्ष घेईल तो निर्णय सगळयांना मान्य असतो. निवडणुकीत हेवेदावे होतात, मांडीला मांडी लावून बसणारे विरोधात जातात, पण हे सर्व तात्पुरते असते. जो चांगलं काम करत असेल त्यालाच पक्ष तिकीट देतो. त्यामुळे तिकीट वाटपाच्या १५ दिवसांत सर्व परिस्थिती कशी हाताळायची, हे एक टेक्निक असतं. ते आम्ही इतरांसमोर उघड का करावं? आम्ही यावेळची निवडणूक आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली लढणार आहोत. ते जे निर्णय घेतील, ते पक्षाच्या हिताचेच असतील, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
शिवसेनेत ‘टीम आदित्य’ची बांधणी, ज्येष्ठांचा पत्ता कट, निवडणुकीत तरुणांना संधी? आदित्य ठाकरे म्हणाले…

नक्की काय आहे प्रकरण?

मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेने तरुण उमेदवार रिंगणात उतरविण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरु केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नगरसेवकांऐवजी शिवसेना यंदाच्या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे सांगितले जात होते. ठाणे महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता असून या पक्षाचे ६० टक्क्यांपेक्षा अधिक नगरसेवक हे ५० वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत. या प्रभागांमध्ये पन्नाशीच्या आसपास असलेल्या तरुण उमेदवारांना संधी देता येईल का यासंबंधी पक्षात खल सुरू झाला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंबंधीच्या सूचना पक्षातील काही नेत्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : kishori pednekar reaction on speculation about shiv sena leader aditya thackeray giving chance to young candidates instead coroporaters crossing 50 age limit in bmc mumbai election
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here