हायलाइट्स:

  • ‘शिप्स ऑफ द डेजर्ट’ स्पर्धा
  • स्पर्धेत महिलांनीही नोंदवला सहभाग
  • ‘सामाजिक प्रतिष्ठा’ लाभल्याची महिलांची प्रतिक्रिया

रियाध, सौदी अरेबिया :

संयुक्त अरब अमिरातच्या पावलावर पाऊल ठेवत सौदी अरेबियानं महिलांना त्यांचे अधिकार बहाल करण्याचं स्वीकारलंय. सौदीमध्ये पहिल्यांदाच महिलांनी बहुचर्चित अशा उंट सौंदर्य स्पर्धेत सहभाग नोंदवला.

यंदा ‘वाळवंटातील जहाजे‘ या उंटांच्या सौंदर्य स्पर्धेत महिलांनीदेखील सहभाग घेतलेला दिसला. ही स्पर्धा देशातील प्रतिष्ठित ‘किंग अब्दुलअजीझ महोत्सवा’चा एक भाग आहे. देशातील रुमाह वाळवंटात आठवड्याच्या शेवटी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत आतापर्यंत फक्त पुरुषच सहभाग घेत होते. मात्र, यंदा आपल्या उंटांसहीत स्पर्धेत सहभागी होताना महिलांनीही आनंद व्यक्त केलाय.

‘आज मला सामाजिक स्थिती लाभली’, अशी प्रतिक्रिया या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या २७ वर्षीय लामिया अल-रशिदी हिनं व्यक्त केली. ‘मला लहानपणापासून उंटांची आवड आहे. माझ्या कुटुंबात ४० उंट आहेत. हा कार्यक्रम महिलांसाठी खुला झाल्यावर मी त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला’ असंही रशिदी हिनं म्हटलंय. यावेळी तिनं आपल्या खांद्यावर शाल घेतलेली होती तसंच तिचा चेहरा हिजाबनं झाकलेला होता.

आयशा मलिक… पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश!
Muhammad Khorasani: पाकिस्तानचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मोहम्मद खुरासानी अफगाणिस्तानात ठार
उंट सौंदर्य स्पर्धेत एकूण ४० जणांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत पहिल्या पाच स्पर्धकांना एकूण दोन लाख ६० हजार डॉलर्सचं बक्षीस दिलं जाणार आहे. यामध्ये, उंटाचे सौंदर्य अनेक घटकांद्वारे निर्धारित केले जाते. यासाठी उंटाचे ओठ, मान आणि कुबड्याचा आकार यात निर्णायक घटक मानले जातात. स्पर्धेदरम्यान महिला लाल वाळूवर घोडेस्वारी करताना दिसल्या. यावेळी पुरुष स्पर्धकही उपस्थित होते. या स्पर्धेत सहभागी झालेली मलाथ बिंत इनाद ही केवळ सात वर्षांची आणि सर्वात तरुण स्पर्धक ठरली. तिच्या उंटाला तिसरे पारितोषिक मिळाले आहे.

‘महिला आपल्या समाजाचा अविभाज्य भाग आहेत. महिला उंट पाळतात आणि त्यांची देखभाल करतात .ऐतिहासिक वारसा ध्यानात घेऊन महिलांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी देण्यात आली, असं महोत्सवाचे व्यवस्थापक मोहम्मद अल हरबी यांनी म्हटलंय.

तेल समृद्ध देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौदी अरेबियामध्ये शरिया कायदा लागू आहे. परंतु क्राउन प्रिन्स मोहम्मद सलमान यांनी २०१७ मध्ये सत्ता हाती घेतल्यापासून महिलांवरील अनेक निर्बंध हटवण्यात आले आहेत. महिलांना आता वाहन चालविण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

Organ Transplant: ब्राव्हो! मानवी शरीराला जोडलं डुक्कराचं हृदय, शास्त्रज्ञांना मोठं यश
Omicron Vaccine: ‘ओमिक्रॉन व्हेरियंट’ला लक्ष्य करणारी लस लवकरच, ‘फायझर’ची माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here