नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे चाहते देशभरातच नाही, तर परदेशातही आहेत. जागतिक क्रिकेटमधील धोनीचे स्थान वेगळे आहे. सध्या तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर गेला असला तरी तो आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. ‘कॅप्टन कूल’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या धोनीचे पाकिस्तानमध्येही चाहते आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज हा देखील त्यापैकी एक. धोनीने रौफला ऑटोग्राफ केलेली जर्सी भेट दिली, त्यानंतर पाकिस्तानी गोलंदाजाच्या आनंदाला पारावार उरला नाही.
माहीने त्याची चेन्नई सुपर किंग्जची ७ क्रमांकाची जर्सी रौफला भेट म्हणून दिली आहे. या जर्सीवर धोनीचा ऑटोग्राफ दिसत आहे. हारिसने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली. रौफने सीएसकेचे संघ व्यवस्थापक रसेल राधाकृष्णन यांचेही आभार मानले आहेत.

धोनीने दिलेल्या जर्सीचा फोटो रौफने ट्विटरवर शेअर केला. पाकच्या या वेगवान गोलंदाजाने ट्विट केले की, ‘लिजेंड आणि कॅप्टन कूल धोनीने त्याचा सुंदर शर्ट देऊन माझा सन्मान केला. सात क्रमांक अजूनही आपल्या उत्कृष्ट उदारतेने लोकांची मने जिंकत आहे. पाठिंब्याबद्दल रसेलचे आभार.’

रौफने २०२० मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज असलेल्या रौफने अल्पावधीतच पाकिस्तान संघात आपले स्थान पक्के केले. आपल्या वेगवान गोलंदाजीने तो फलंदाजांच्या मनात भीती निर्माण करत आहे.

पीएसएलमध्ये लाहोर कलंदरकडून खेळणार रौफ
रौफ सध्या ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये खेळत आहे. यानंतर तो पाकिस्तान सुपर लीग २०२२ मध्ये खेळताना दिसणार आहे. पीएसएलमध्ये तो लाहोर कलंदर संघाकडून खेळणार आहे. येत्या २७ जानेवारीपासून पीएसएल सुरू होणार आहे.

धोनीच्या नेतृत्वाखाली CSKने चार वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले
दुसरीकडे धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज () ला चार वेळा आयपीएल (IPL) चॅम्पियन बनवले आहे. सीएसकेने गेल्या वर्षी आयपीएल २०२१ च्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव करून चौथ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. ४० वर्षीय धोनी गेल्या हंगामात फलंदाजीत काही खास कामगिरी बजावू शकला नाही, पण आपल्या खास रणनीतीच्या बळावर त्याने चेन्नईला जेतेपद मिळवून दिले. त्यामुळेच चेन्नईने आयपीएल २०२२ साठी धोनीला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. आयपीएलच्या १५ व्या हंगामापूर्वी सीएसकेने धोनीला १२ कोटी रुपयांमध्ये संघात कायम ठेवले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here