सामाजिक माध्यमे प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा फोटो तेजीनं व्हायरल होताना दिसला. या फोटोत केवळ एक अंडं दिसतंय…. आता तुम्ही म्हणाल यात काय खास… या फोटोचं वैशिष्ट्यं म्हणजे, या फोटोला आतापर्यंत इतके लाईक्स मिळालेत की या फोटोला थेट ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्‘मध्ये (गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड) जागा मिळाली आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसनं आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून ही माहिती दिलीय.
उल्लेखनीय म्हणजे, एका सर्वसाधारण अंड्याच्या या फोटोनं ग्लॅमरच्या जगातील प्रसिद्ध मॉडेल काइली जेनर (Kylie Jenner) हिच्या फोटोलाही ‘लाईक्स’च्या बाबतीत मागे सोडलंय.
‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्’नं दिलेल्या माहितीनुसार, हा फोटो २०१९ मध्ये इंस्टाग्रामवर पहिल्यांदा पोस्ट करण्यात आला होता. हा एका साध्या अंड्याचा फोटो आहे.
या अगोदर सर्वाधिक ‘लाईक्स’ मिळवण्याचा रेकॉर्ड काइली जेनरच्या फोटोच्या नावावर होता. मात्र, एका मोहिमेदरम्यान प्रसिद्ध करण्यात आलेला अंड्याच्या या फोटोला सर्वाधिक लाईक्स मिळवून देण्याचं आवाहन सोशल मीडियावर करण्यात आलं होतं. त्याला युझर्सनं भरभरून प्रतिसादही दिला. जगभरातील तब्बल ५५.५ दशलक्ष युझर्सनं या फोटोला आपली पसंती व्यक्त केलीय.