मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे निर्णय घेतात. त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना समोर येण्यास मर्यादा होत्या. पण कालच्या बैठकीत झालेली चर्चा परिवहनमंत्र्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवली असणार.

एखाद्या कामगार संघटनेने बोलावलं तर मला चर्चा करण्याचा अधिकार आहे. त्या अधिकाराने चर्चा करण्यात काहीही चुकीचं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे निर्णय घेतात.
हायलाइट्स:
- शरद पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत सोमवारी एसटी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती
- याच बैठकीवरुन भाजप नेते शिवसेना आणि राष्ट्रवादीला लक्ष्य करताना दिसत आहेत
एसटी कर्मचाऱ्यांनी राज्याचा महसूल घटवून शरद पवारांना चर्चा करायला भाग पाडलं – पडळकर
राम कदम काय म्हणाले होते?
राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत सोमवारी एसटी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर २२ एसटी संघटनांच्या पदाधिकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, आता याच बैठकीवरुन भाजप नेते शिवसेना आणि राष्ट्रवादीला लक्ष्य करताना दिसत आहेत. भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा चार्ज शरद पवार (शरद पवार) यांच्याकडे दिला आहे का, असा सवाल उपस्थित केला. माननीय शरद पवार यांना मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा चार्ज दिला आहे का ? जर तसे नसेल तर ते घटनाबाह्य आहे. शरद पवार संविधानाला डावलून मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात? शरद पवार यांना बैठका घ्यायचाच असतील तर मुख्यमंत्री त्यांना चार्ज का देत नाहीत ? केवळ एकच निदान माफक अपेक्षा, असे राम कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून