हायलाइट्स:

  • व्हेल माशाची उलटीची तस्करी, तिघांना अटक
  • रायगड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
  • अलिबाग-मुरूड रस्त्यावर सापळा रचून केली तिघांना अटक

मुरूड: खोल समुद्रातील व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी आणणाऱ्या तिघांना रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. अलिबाग-मुरूड रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हेल माशाच्या उलटीपासून सुगंधी द्रव्ये व इतर सुवासिक रसायने बनवली जातात. व्हेल माशाच्या उलटीला फरफ्युमच्या उद्योगात प्रचंड मागणी असून, या माध्यमातून कोट्यवधींची कमाई केली जाते. व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी आणणाऱ्या तिघांना रायगडमधील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

Ratnagiri Theft : मंदिरात झाली होती चोरी; सीसीटीव्ही फुटेजमधून धक्कादायक माहिती उघड
घरात सगळे झोपले होते, लॅच लॉक तोडून दरोडेखोरांनी आत प्रवेश केला आणि…

१० जानेवारी रोजी मुरूड तालुक्यातील काशिद गावातील नाक्यावर तीन जण दोन दुचाकींवरून जात होते. व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी नेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस नाईक अक्षय जाधव यांना खबऱ्यांमार्फत मिळाली. त्यानंतर पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक, पवनकुमार ठाकूर व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करण्यात आले.

केवायसी अपडेटच्या बहाण्याने निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला गंडा

व्हेल माशाची उलटी विक्रीकरीता येणाऱ्यांची सविस्तर माहिती मिळाल्यानंतर अलिबाग-मुरूड रस्त्यावरील एका गेस्ट हाउससमोर सापळा रचला. या कारवाईत दर्पण रमेश गुंड (वय ३९, रा. मजगाव) नंदकुमार खंडू थोरवे (वय ४१, रा. नांदगाव), राजेंद्र जनार्दन ठाकूर (वय ५०, रा. मजगाव) या तिघांकडून ५ किलो वजन असलेली व्हेल माशाची उल्टी (अंबरग्रीस) तपकिरी रंगाचे साधारण ओलसर व सुंगधित पदार्थ व दुचाकी असा एकूण ५,९०,००० रूपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. आरोपींविरोधात मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पवनकुमार ठाकूर, पोलीस कर्मचारी बंधू चिमटे, हणमंत सूर्यवंशी, अक्षय जाधव, ईश्वर लांबोटे हे देखील सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here