हायलाइट्स:

  • रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचा उद्रेक
  • रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभरात दोनशेहून अधिक रुग्णांची नोंद
  • आतापर्यंतची एकूण बाधित रुग्णांची संख्या ८०,०९४ इतकी झालीय

रत्नागिरी: शहरी भागासह ग्रामीण भागातही करोनाचा प्रादूर्भाव वाढताना दिसत आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातही करण्यासाठी रुग्णांचा आकडा आज, मंगळवारी वाढला असून, मंगळवारी सायंकाळी उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात २०३ नव्या बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात ११ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. १५१० जणांच्या नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात २०३ रुग्णांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध जारी केले आहेत. जिल्ह्यात सध्या ६२२ करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दैनंदिन आरटीपीसीआर टेस्टपैकी १३.५७ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे. आज नवीन २०३ करोनाबाधित रुग्ण नोंदवले गेले आहेत. जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधित रुग्णांची संख्या ८०,०९४ असून त्यातील ७६,९४२ जणांनी करोनावर मात केली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०९%. इतके आहे. २४ तासांत एकाही बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मात्र आतापर्यंत २,४९२ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ६२२ जणांवर करोनाचे उपचार सुरू असले तरी, यामध्ये ४८४ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. डीसीएच केअर सेंटरमध्ये उपलब्ध असलेल्या बेडची संख्या ११०८ असून ७८ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड ३, दापोली १६, खेड २०, गुहागर १२, चिपळूण ७६, संगमेश्वर ८, रत्नागिरी ५७, लांजा १, राजापूर ११ रूग्ण.

कोकणातील मिनी महाबळेश्वर दापोलीत हुडहुडी; तापमानात ९.२ अंशांपर्यंत घसरण
अरेरे! दम्याचा आजाराला आजोबा कंटाळले, म्हणाले पाय मोकळे करुन येतो अन् धरणावर जाऊन….

कल्याणच्या आधारवाडी जेलमध्ये करोनाचा शिरकाव

राज्यात करोना प्रादूर्भाव वाढत असून, आता कल्याणच्या आधारवाडी तुरुंगामधील ३२ कैदी आणि ३ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. ६ जानेवारी रोजी तुरूंग प्रशासनाने कैद्यांची करोना चाचणी केली होती. त्याचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला. यात ३२ कैद्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर तुरुंगातील तीन कर्मचाऱ्यांनाही करोना संसर्ग झाला आहे.

रत्नागिरीत शेतकऱ्याने अवघ्या वीस गुंठ्यावर फुलवला कॉफीचा मळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here