हायलाइट्स:

  • कल्याण कोळसेवाडी परिसरात एका कार्यक्रमात हवेत गोळीबार
  • सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
  • कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,
  • तिघांना केली अटक, तपास सुरू

कल्याण: कल्याण (कल्याण) येथील कोळसेवाडी परिसरात खळबळजनक घटना घडली आहे. एका नामांकित विकसकाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हवेत गोळीबार करण्यात आला. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर कोळसेवाडी पोलिसांनी चार जणांविरोधात गोळीबार केल्यानंतर तिघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात एका कार्यक्रमात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका नामांकित विकसकाच्या नातेवाइकाच्या कार्यक्रमात गाण्यांवर डान्स सुरू होता. स्टेजवर अनेक जण होते. तर स्टेजच्या खालीही अनेक जण नाचत होते. त्याचवेळी एकाने हवेत पिस्तुलातून गोळीबार केला. दोन-तीन फायरिंग करण्यात आल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ कोळसेवाडी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्यांनी तात्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला.

व्हेल माशाची उलटी विक्रीला आणली होती, तिघांना गुन्हे शाखेने केली अटक; कोट्यवधींची केली जातेय कमाई
केवायसी अपडेटच्या बहाण्याने निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला गंडा

पोलिसांनी तपास केल्यानंतर या प्रकरणात चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत कल्याणमधील एक नामांकित उद्योजक स्टेजवर डान्स करताना दिसत आहेत. तर त्यांचे नातेवाइक हवेत गोळीबार करताना या व्हिडिओत दिसतात. सध्या कोळसेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. नामांकित विकसकाच्या नातेवाइकांची चौकशी सुरू केली आहे. चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, तिघांना अटक केली आहे. तसेच नातेवाइकांकडे असलेल्या पिस्तुलाचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असे सांगितले जात आहे.

याबाबत कल्याणचे एसीपी उमेश माने पाटील यांनी सांगितले की, व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्या अनुषंगाने कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास करून हवेत गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. शिवाय याचा पुढील तपास सुरू आहे. हवेत गोळीबार करणाऱ्या सदर व्यक्तीजवळील पिस्तुलाचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून मी लोकांना सांगू इच्छितो की, अशा पद्धतीने हवेत गोळीबार करून लोकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरोधात कडक कारवाई करण्यात येईल. शिवाय आपल्या आसपास अशा प्रकारची कोणती घटना घडत असेल तर, जवळच्या पोलीस ठाण्यात त्याबाबत माहिती द्यावी, असे आवाहनही माने पाटील यांनी केले.

कचऱ्याच्या वादातून इंजिनीअरकडून खून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here