‘गर्दीच्या ठिकाणांहून आणि लग्न समारंभांमधून करोना संसर्गाचे प्रमाण जास्त होत असल्याचे लक्षात आल्यामुळे अशा ठिकाणांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. शहरातील गर्दीची ठिकाणे, बाजारपेठांमध्ये या पथकांच्या मदतीने व्हिडिओ शूटिंग केले जाणार आहे. त्याआधारे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विनामास्क फिरणाऱ्या वाहनचालकांचेही व्हिडिओ शूटिंग केले जाणार आहे. वाहनांचा क्रमांक आरटीओ कार्यालयाला कळवला जाणार असून, या कार्यालयातर्फे संबंधित वाहनांवर कारवाई केली जाणार आहे. आतापर्यंत पालिकेच्या यंत्रणेने तीनशेपेक्षा जास्त वाहनांची माहिती आरटीओ कार्यालयाला दिली आहे, हे कार्यालय अपेक्षित कारवाई करील,’ असे पांडेय म्हणाले.
अशा आहेत उपाययोजना
– लग्न समारंभांसाठी फक्त ५० जणांनाच उपस्थितीची परवानगी
– या निर्णयाच्या अंमलबजावणीवर करण्याची जबाबदारी वॉर्ड ऑफिसरांची
– कार्यक्षेत्रातील लग्न समारंभांवर लक्ष ठेवणे, लग्नाच्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ शूटिंग करणे, निकषापेक्षा जास्त गर्दी असल्यास आयोजकांवर कारवाई करणे असे अधिकार वॉर्ड अधिकाऱ्यांना प्रदान