औरंगाबाद : सोमवारी पैठण शहरात आलेल्या गूढ आवाजाला एक दिवस उलटत नाही तोच दुसऱ्या दिवशी ( मंगळवारी ) कन्नड शहर व तालुक्यातील बहुतांश भागात दुपारी दीड व चार वाजता गूढ आवाज झाला. या आवाजाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, हा आवाज व हादरे भूकंपाचे नसल्याचे कन्नडचे तहसीलदार संजय वाडकर यांनी स्पष्ट केले आहे.

सोमवारी पैठण शहरात आलेल्या गूढ आवाजाने जुन्या भागातील जोहरीवाडा, रंगारहट्टी, नेहरूचौक, दारुसलाम, सादात मोहल्ला, भाजी मार्केट परिसरात घरांच्याभीती हादरल्या, छताचे पत्रे थरथरले तर काही ठिकाणी खिडकीच्या काचांनाही तडे गेल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला होता. त्यापाठोपाठ मंगळवारी कन्नड शहरातील छाजेड नगर, हुकुमचंद नगर, सरस्वती कॉलनी तसेच ग्रामीण भागातील पिशोर चापानेर, टापर गाव, हतनूर, अंधानेर, चिकलठाण या गाव परीसरात मंगळवारी दुपारी दीड वाजता व चार वाजता भूकंप सदृश्य आवाजाने खिडक्या, दारे व कपाटे हलले व गूढ आवाजाने परीसर हादरून गेला.
सावधान! लशीनंतर पॅरासिटामॉल घ्यावी का? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
भूकंपाच्या भीतीने नागरीक घराबाहेर

अचानकपणे आलेलं गूढ आवाज कशाचा आहे हे समजण्यापूर्वीच खिडक्या, दारे व कपाटे हलू लागल्याने भूकंपाच्या भीतीने नागरीक घराबाहेर पडले. मात्र, सिस्मोग्राफ परिसरात भूकंपाची नोंद नसून काहीतरी भूगर्भीय हालचाली झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, गूढ आवाज व भूगर्भीय हालचाली हा भूकंप नक्कीच नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अशी माहिती कन्नडचे तहसीलदार संजय वारकड यांनी दिली.

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! फ्लॉवर, मिरचीसह गवारही महाग, पाहा काय आहेत नवे दर?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here