फडणवीस यांनी शिवसेनेच्या डिपॉझिटची काळजी करण्यापेक्षा प्रथम पक्षातंर्गत युद्ध लढावे. गोव्यात भाजप नेते निवडणुकीसाठी पैशांचा पाऊस पाडत आहेत. महाराष्ट्रातून गोव्यात नोटांच्या बॅगा जात आहेत.

संजय राऊत TOI

शरद पवार यांच्याविषयी बोलण्यासाठी आधी राजकारण, समाजकारण आणि त्यांच्याइतकी व्यक्तीमत्त्वाची उंची गाठावी.

हायलाइट्स:

  • शरद पवार यांच्याविषयी बोलण्यासाठी आधी राजकारण, समाजकारण आणि त्यांच्याइतकी व्यक्तीमत्त्वाची उंची गाठावी
  • तुमच्यासारख्या टेकड्यांना सह्याद्री किंवा हिमालयाची उंची लक्षात येणार नाही

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातून बाहेर कधी पडणार आणि शरद पवार पंतप्रधान कधी होणार, असा सवाल उपस्थित करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शिवसेना खासदार संजय राऊत (संजय राऊत) यांनी चोख प्रत्युत्तर दिले. चंद्रकांत पाटील यांना या दोन्ही प्रश्नांची उत्तरे योग्यवेळी मिळतील. उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे) यांचं काम सुरुच आहे. उद्या ते पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच्या बैठकीत सहभागी होतील, ते आपण स्वत: पाहालच. तर शरद पवार यांच्याविषयी बोलण्यासाठी आधी राजकारण, समाजकारण आणि त्यांच्याइतकी व्यक्तीमत्त्वाची उंची गाठावी. तुमच्यासारख्या टेकड्यांना सह्याद्री किंवा हिमालयाची उंची लक्षात येणार नाही. एखादी व्यक्ती फक्त पंतप्रधानपदावर बसली म्हणून मोठी होत नाही. पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांची उंची ही पंतप्रधान होण्यापूर्वीच मोठी होती. अनेक चांगल्या व्यक्ती पंतप्रधानपदापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी त्यांनी गोव्यातील राजकारणावरुन देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. देवेंद्र फडणवीस गोव्यात गेले आणि त्याठिकाणी भाजप पक्ष फुटला. त्यामुळे फडणवीस यांनी शिवसेनेच्या डिपॉझिटची काळजी करण्यापेक्षा प्रथम पक्षातंर्गत युद्ध लढावे. गोव्यात भाजप नेते निवडणुकीसाठी पैशांचा पाऊस पाडत आहेत. महाराष्ट्रातून गोव्यात नोटांच्या बॅगा जात आहेत. त्यामुळे गोव्यात खरी लढाई नोटांशी आहे. पण मी देवेंद्र फडणवीस यांना सांगतो की, तुम्ही कितीही नोटा टाका आणि त्याच्याशी लढू, असे राऊत यांनी म्हटले.
भाजपचे १३ आमदार राजीनामा देणार, शरद पवारांचा खळबळजनक दावा
तर उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता येणार, असे निष्कर्ष काही मतदानपूर्व चाचण्यांमध्ये समोर आले आहेत. भाजपला तसे वाटत असेल वाटू दे. पण सत्तेत येणाऱ्या पक्षाला कधीच गळती लागत नाही. त्या पक्षाचे आमदार, मंत्री किंवा प्रमुख कार्यकर्ते पक्ष सोडून जात नाहीत. उत्तर प्रदेशचा प्रवास हा परिवर्तनाच्या दिशेने सुरु आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: shivsena mp sanjay raut hits back bjp chandrakant patil over criticism about cm uddhav thackeray and sharad pawar
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here