हायलाइट्स:

  • भारताच्या शेजारील देशाची ही परिस्थिती
  • करोना महामारीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम
  • खावं तरी काय? सामान्य नागरिकांसमोर प्रश्न

कोलंबो, श्रीलंका :

भारताचा शेजारी देश श्रीलंका सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहचलाय. श्रीलंकेत सध्या रोजच्या वापरातील वस्तूंच्या किंमती आभाळाला भिडलेल्या दिसून येत आहेत. यामुळे सामान्य जनता हैराण झालीय.

मिरची : ७०० रुपये किलो

श्रीलंकेत मागच्या एका महिन्यात खाण्या-पिण्याच्या गोष्टींच्या किंमतीत १५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आलीय. १०० ग्रॅम मिरची खरेदी करण्यासाठी नागरिकांना तब्बल ७१ रुपये मोजावे लागत आहेत. म्हणजेच एक किलो मिरचीसाठी ७०० रुपये… गेल्या महिन्याभरात मिरचीच्या किंमतीत २५० टक्क्यांनी वाढ झालीय.

भाज्या-फळभाज्यांच्या किंमतींतही वाढ झाल्यानं सामान्य नागरिकांना काय खावं? असा प्रश्न पडलाय. देशात भाज्यांच्या किंमती काही अशा आहेत….

वांगी – १६० रुपये किलो
कारली – १६० रुपये किलो
भेंडी – २०० रुपये किलो
टोमॅटो – २०० रुपये किलो
कोबी – २४० रुपये किलो
सोयाबीन – 320 रुपये प्रति किलो

‘भारतासोबत वैर नाही’; आर्थिकदृष्ट्या कंबरडं मोडल्यानंतर पाकिस्तानला सुचला शहाणपणा
Omicron Vaccine: ‘ओमिक्रॉन व्हेरियंट’ला लक्ष्य करणारी लस लवकरच, ‘फायझर’ची माहिती
देशावरचं आजवरचं सर्वात मोठं आर्थिक संकट

जवळपास २.२ कोटी लोकसंख्या असणारा हा देश आपल्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करतोय. नोव्हेंबरच्या अखेरीस देशाचा परकीय चलन साठा सुमारे १.६ अब्ज डॉलरपर्यंत खाली घसरला होता. हा साठा केवळ काही आठवड्यांच्या आयातीसाठी पुरेसा होता. यामुळे सरकारला अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीवर निर्बंध घालणं भाग पडलं. त्यामुळे श्रीलंकेत अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा वाढला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली.

आयात बंद… अन्नधान्याचा तुटवडा!

श्रीलंकेत गेल्या चार महिन्यांत एका एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत जवळपास ८५ टक्के वाढ झाल्याचा अंदाज आहे. देशात आयात बंद झाल्यानं दुधाच्या दरात मोठी वाढ झाली. एका वृत्तसंस्थेनुसार, श्रीलंका मोठ्या प्रमाणात अन्नधान्यासाठी आयातीवर अवलंबून आहे, परंतु सध्या श्रीलंकेला परकीय चलनाच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. ज्याचा थेट परिणाम त्याच्या अन्नाच्या आवश्यकतेवर होताना दिसून येतोय.

जागतिक महामारीचा कहर

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, २०१९ मध्ये श्रीलंकेनं पर्यटनाच्या माध्यमातून जवळपास सुमारे चार अब्ज डॉलरची कमाई केली होती. परंतु करोना संसर्गात देशाच्या अर्थव्यवस्थेवर जवळपास ९० टक्के परिणाम दिसून आला आणि देशाची अर्थव्यवस्था कमालीची कमकुवत झाली.

पाकिस्तानात बर्फाच्या वादळात गाडले गेले चार मित्र! अखेरचा सेल्फी व्हायरल
Guinness World Records: सोशल मीडियावर ५ कोटी लाईक मिळवणारा ‘अंडे का फंडा’!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here