नागपूर : नागपूरसह संपूर्ण विदर्भाला मंगळवारी परत एकदा वादळी पावसाने झोडपले. शहरात सकाळी व दुपारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. जिल्ह्यात काटोल, नरखेड आणि रामटेक तालुक्यांत तुरळक ठिकाणी गारपीटही झाली. यामुळे रब्बी पिकांकडे आशा लावून बसलेला शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पुढील दोन दिवस शहरात वादळी पावसाचा हा तडाखा कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पुढील दोन दिवस वातावरण कायम राहण्याचा अंदाज

मध्यंतरी झालेल्या पावसानंतर वातावरण कोरडे होऊ लागले होते. परंतु, गेल्या आठवड्याच्या अखेरीस पुन्हा पावसाला सुरुवात झाली. प्रादेशिक हवामान खात्याने शहर, तसेच विदर्भाला ‘यलो अलर्ट’ही दिला आहे. याखेरीज, त्यापुढील दोन दिवस अर्थात शुक्रवार आणि शनिवारीसुद्धा वातावरण ढगाळच राहणार आहे. रविवारपासूनच वातावरण कोरडे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूरकरांचा हा आठवडा पावसाळी वातावरणात जाणार असल्याचे संकेत आहेत.

सावधान! लशीनंतर पॅरासिटामॉल घ्यावी का? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

नागपूरकरांचा हा आठवडा पावसाळी वातावरणात जाणार असल्याचे संकेत आहेत. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे नागपूरकरिता हिवाळ्याचे महिने समजले जातात. मात्र, यंदा नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांमध्ये दर पंधरा दिवसांनी पावसाने हजेरी लावली. यंदा डिसेंबरमध्ये सर्वाधिक कमी ७.६ अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. हा यंदाच्या मोसमातील नीचांक होता. दरम्यान, मंगळवारी १७.५ अंश इतक्या किमान, तर २२.५ अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली.

औरंगाबादमध्ये भूकंप नाही मग घरं हादरवणारा आवाज कसला? नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here