नागपूर : वारंवार आवाहन करूनही कामावर परत येत नसलेल्यांपैकी २३ कर्मचाऱ्यांवर मंगळवारी नागपूर विभागात बडतर्फीची कारवाई करण्यात आली. त्यामुळे आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या १०९ झाली आहे.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. संप मागे घ्यावा म्हणून राज्य सरकारने वेतनवाढ केली; मात्र, ‘आम्हाला वेतनवाढ नको तर विलीनीकरणच हवे’ असे सांगत कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला. त्यामुळे निलंबन, बदली अशी कारवाई सुरू करण्यात आली. त्यानंतरही संपातून माघार नसल्याने त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई सुरू झाली. मंगळवारी एकाच दिवशी वर्धमाननगर आगारातील २३ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. त्यामुळे विभागातील बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या आता १०९ झाली आहे. यात ४४ चालक, ४९ वाहक, ३ चालक-वाहक तसेच १३ यांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सावधान! लशीनंतर पॅरासिटामॉल घ्यावी का? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
२५ टक्के कर्मचारी कामावर

एसटीच्या नागपूर विभागातील एकूण कर्मचाऱ्यांपैकी सध्या जवळपास २५ टक्के कर्मचारी कामावर हजर, तर उर्वरित संपावर आहेत. प्रशासकीय, कार्यशाळा, चालक, वाहक मिळून विभागात २ हजार ४२८ कर्मचारी आहेत. यापैकी सध्या ६१० कर्मचारी कामावर हजर आहेत. ९३ कर्मचारी रजेवर आहेत, तर १ हजार ७८० कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

Weather Alert : राज्यावर पुढील २ दिवस अस्मानी संकट, हवामान खात्याकडून यलो अलर्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here